Monday, July 28, 2025
Homeब्रेकिंगऑक्टोबरमध्ये बँकांना असणार इतके दिवस सुट्टी

ऑक्टोबरमध्ये बँकांना असणार इतके दिवस सुट्टी

 

ऑक्टोबर हा सणासुदीचा महिना आहे. तुम्हालाही ऑक्टोबर महिन्यात बँकेत जावे लागत असेल किंवा काही काम असेल, तर त्याआधी सुट्ट्यांची यादी जरुर पाहा.

 

ऑक्टोबर महिन्यात एकूण 16 दिवस बँका बंद राहणार आहेत. यामध्ये राज्याच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. याबाबतची माहिती रिझर्व्ह बँकेने यादी प्रसिद्ध करुन दिली आहे.

 

शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे

बँक सुट्ट्यांच्या यादीत 5 रविवार आणि 2 शनिवार देखील समाविष्ट आहेत. ऑक्टोबर महिन्यात अनेक बँकांना सुट्ट्या असणार आहेत.

 

अशा परिस्थितीत बँकांशी संबंधित कोणतेही काम असेल तर ते वेळेवर आणि लवकरात लवकर पूर्ण करा.

 

ऑक्टोबर बँक सुट्ट्यांची यादी

2 ऑक्टोबर (सोमवार) – गांधी जयंती – राष्ट्रीय सुट्टी

 

14 ऑक्टोबर (शनिवार) – महालय – कोलकाता येथे बँका बंद आहेत.

 

18 ऑक्टोबर (बुधवार) – काटी बिहू – आसाममध्ये बँका बंद आहेत.

 

21 ऑक्टोबर (शनिवार) – दुर्गा पूजा (महा सप्तमी) – त्रिपुरा, आसाम, मणिपूर आणि बंगालमध्ये बँका बंद आहेत.

 

23 ऑक्टोबर (सोमवार) – दसरा (महानवमी)/आयुधा पूजा/दुर्गा पूजा/विजय दशमी – त्रिपुरा, कर्नाटक, ओडिशा, तामिळनाडू, आसाम, आंध्र प्रदेश, कानपूर, केरळ, जरकाखंड, बिहारमध्ये बँका बंद आहेत.

 

24 ऑक्टोबर (मंगळवार) – दसरा (विजयादशमी)/दुर्गा पूजा – आंध्र प्रदेश, मणिपूर वगळता सर्व राज्यांमध्ये बँका बंद आहेत.

 

25 ऑक्टोबर (बुधवार) – दुर्गा पूजा – सिक्कीममध्ये बँका बंद आहेत.

 

26 ऑक्टोबर (गुरुवार) – दुर्गा पूजा (दसैन) / विलीनीकरण दिवस – सिक्कीम, जम्मू आणि काश्मीरमध्ये बँका बंद आहेत.

 

27 ऑक्टोबर, (शुक्रवार) दुर्गा पूजा (दसैन) – सिक्कीममध्ये बँका बंद आहेत.

 

28 ऑक्टोबर (शनिवार) – लक्ष्मी पूजा – बंगालमध्ये बँका बंद आहेत.

 

31 ऑक्टोबर (मंगळवार) – सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन – गुजरातमध्ये बँका बंद आहेत.

 

शनिवार आणि रविवारी बँका बंद राहतील

1 ऑक्टोबरला रविवार असल्याने देशभरातील बँका बंद राहणार आहेत. याशिवाय 8, 15, 22 आणि 29 ऑक्टोबरला रविवार असल्याने बँका बंद राहतील.

 

याशिवाय 14 आणि 28 ऑक्टोबरला दुसरा आणि चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद राहणार आहेत.

 

सुट्ट्यांची यादी पाहून नियोजन करा

ऑक्टोबर महिन्यात सुट्ट्यांमुळे बँका बंद राहणार असून मोबाईल नेट बँकिंगच्या माध्यमातून लोक घरी बसून आपली कामे करु शकतील अशी सुविधा बँकेने उपलब्ध करुन दिली आहे, परंतु अशा परिस्थितीत एटीएममधून (ATM) पैसे काढताना तुम्हाला अडचणी येऊ शकतात.

म्णूहन, सुट्टीपूर्वी रोख रकमेची व्यवस्था करा. ऑक्टोबरमध्ये जवळपास 16 दिवस बँका बंद राहणार आहेत, त्यामुळे सुट्ट्यांची यादी पाहूनच तुमचे नियोजन करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -