Tuesday, August 5, 2025
Homeब्रेकिंगदिवाळीआधी शेतकऱ्यांना मिळणार मोठं गिफ्ट, केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय! 

दिवाळीआधी शेतकऱ्यांना मिळणार मोठं गिफ्ट, केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय! 

येत्या काही महिन्यांत पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणुकांपूर्वी केंद्र सरकारकडून देशभरातल्या शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण भेट मिळू शकते.

रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीबाबत अर्थात एमएसपीबाबत सरकार लवकरच मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. या हंगामात रब्बी पिकांच्या एमएसपीत सरकार मोठी वाढ करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील वर्षासाठी गव्हाची एमएसपी 150 रुपयांवरून 175 रुपयांपर्यंत वाढू शकते. रब्बी पिकांच्या एमएसपीमध्ये तीन ते 10 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते, असं बोललं जात आहे.

 

यानुसार, गव्हाची एमएसपी 2300 रुपयांपर्यंत असेल. सध्या गव्हाची एमएसपी 2125 रुपये आहे. मसूर डाळीच्या एमएसपीत दहा टक्क्यांपर्यंत वाढू शकते. त्याचप्रमाणे मोहरी आणि सूर्यफुलाच्या एमएसपीमध्ये पाच ते सात टक्क्यांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज आहे. सरकारकडून येत्या आठवड्यात एमएसपीला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. हा निर्णय मार्केटिंग सीझन 2024-25 साठी लागू असेल. कृषी खर्च आणि मूल्य आयोग अर्थात सीएसीपीच्या शिफारशीनुसार केंद्र सरकार एमएसपी निश्चित करत असते. यात 23 पिकांमध्ये भात, गहू, मका, बाजरी, ज्वारी, नाचणी आणि बार्ली या सात धान्यांचा समावेश आहे. तसेच हरभरा, वाटाणा, उडीद, मूग आणि मसूर या पाच डाळींचा तर मोहरी, भुईमूग, सोयाबीन, सूर्यफूल, तीळ, करडई आणि कारळा या सात तेलबिया पिकांचा समावेश आहे. या शिवाय कापूस, ऊस, खोबरं आणि कच्चं ज्युट या चार नगदी पिकांचादेखील एमएसपीत समावेश आहे.

 

रब्बी पिकांची पेरणी साधारणतः ऑक्टोबर – डिसेंबर महिन्यात केली जाते. या पिकांच्या पेरणी कालावधीत तापमान कमी असते. मात्र पिकांच्या वाढीच्या काळात उबदार हवामान गरजेचं असतं. या वेळी बटाटा, गहू, बार्ली, हरभरा, मसूर, जवस, वाटाणा आणि मोहरीची पेरणी केली जाते.

 

गेल्या काही वर्षांत प्रतिकूल हवामान, पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव, वन्य प्राण्यांकडून होणारं पिकांचं नुकसान आदी कारणांमुळे एकूणच पीक उत्पादनात घट होत आहे. परिणामी, शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने समस्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. सरकारने यंदा रब्बी पिकांच्या एमएसपीमध्ये चांगली वाढ केली तर त्याचा शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होणार आहे. सध्याची हवामान, पाण्याची उपलब्धता आणि एकूणच प्रतिकूल स्थिती पाहता शेतकऱ्यांनादेखील सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. त्यामुळे केंद्र सरकार रब्बी हंगामासाठी एमएसपीमध्ये किती वाढ करणार याकडे देशभरातल्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -