Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगसुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूचं कारण अखेर समोर!

सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूचं कारण अखेर समोर!

अभिनेता सुशांत सिंह राजपूत  याच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. तीन वर्षांपूर्वी अभिनेत्याने स्वतःला संपवलं, सुशांत याने इतकं टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण सुशांत मृत्यूपूर्वी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला डेट करत होता. म्हणून अभिनेत्याच्या निधनानंतर रिया हिला अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. पण आता अभिनेत्रीने पुन्हा स्वतःच्या आयुष्याला नव्याने सुरुवात केली आहे. अशात सुशांत याने स्वतःला संपवण्याचा निर्णय का घेतला… याचं कारण देखील रिया हिने नुकताच झालेल्या एका मुलाखतीत दिलं आहे. सध्या सर्वत्र रिया हिच्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे…

 

 

मुलाखतीत अभिनेत्री पूर्वीचं आयुष्य आणि आता जगत असलेल्या आयुष्यावर मोठं स्पष्टीकरण दिलं आहे. मोठ्या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी अभिनेत्रीने थेरेपीची मदत घेत मूव्ह ऑन केलं आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा अनेकांनी रिया हिच्यावर निशाणा साधला होता. एवढंच नाही तर, सुशांत याच्या मृत्यूसाठी अभिनेत्रीला जबाबदार ठरवलं होतं…

 

नुकताच झालेल्या मुलाखतीत रिया म्हणाली, ‘वयाच्या ३१ व्या वर्षी मी ८१ वर्षांच्या महिलेप्रमाणे जगत होती. आयुष्य एक चक्र आहे आणि मी आता माध्यमांसोबत बोलू शकते. मी आता आयुष्यात पुढे जात आहे. कठीण प्रसंगाच्या वेळी तुम्ही देवदास बनता किंवा थेरेपीची मदत घेता. मी थेरेपीची मदत घेतली…’

 

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘दिवस वाईट आणि कठीण होते. पण एक दिवस सर्व काही ठिक होईल… यावर विश्वास होता.’ पुढे अभिनेत्रीला सुशांत याने जो निर्णय घेतला, त्यात तुझा वाटा होता का? असा प्रश्न अभिनेत्रीला विचारण्यात आला. यावर रिया म्हणाली, ‘मी लोकांचे चेहरे वाचू शकते. मला चुडैल हे नाव आवडलं, ज्याचा मला काहीही फरक पडत नाही. मला नाही माहिती सुशांत याने असं का केलं. पण तो कठीण परिस्थितीत होता एवढं माहिती आहे..’ असं अभिनेत्री म्हणाली.

 

सुशांत सिंह राजपूत याने घेतला मोठा निर्णय…

 

सुशांत सिंह राजपूत याने २०२० मध्ये राहत्या घरी स्वतःला संपवलं. अभिनेत्याच्या निधनानंतर रिया चक्रवर्ती हिच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. तेव्हा रिया आणि सुशांत एकमेकांना डेट करत होते. सुशांत याने घेतलेल्या निर्णयानंतर रिया हिच्यावर संशय निर्माण झाला. यामुळे रियाला तुरुंगात जावे लागलं होतं

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -