Monday, July 28, 2025
Homeब्रेकिंगराघव चड्ढांना धक्का, सरकारी बंगला रिकामा करण्याचे कोर्टाचे आदेश !

राघव चड्ढांना धक्का, सरकारी बंगला रिकामा करण्याचे कोर्टाचे आदेश !

 

आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. कारण आता संसद सचिवालयानंतर कोर्टाने देखील राघव चड्ढा यांना सरकारी बंगला रिकामा करण्याचे आदेश जारी केले आहेत . दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने सरकारी बंगला तातडीने रिकामा न केल्याबद्दल राघव चड्ढा यांना चांगलंच सुनावलं असल्याची माहिती समोर आली आहे .

 

याबाबत अधिक माहिती अशी कि , काही महिन्यांपूर्वीच संसद सचिवालयाने आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांना सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीस जारी केली होती. परंतु राघव चड्ढा यांनी बंगला रिकामा न करता थेट पटियाला कोर्टात धाव घेतली. त्यानंतर राघव चड्ढा आणि संसद सचिवालयाच्या वकिलांनी कोर्टात बाजू मांडली. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने राघव चड्ढा यांना सरकारी बंगला रिकामा करण्याचे आदेश जारी केले आहे. सचिवालयाने यापूर्वी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीस जारी केली होती. त्यानंतर आता राघव चड्ढा यांना बंगला रिकामा करण्याचे आदेश देण्यात आल्याने यावरून राजकीय वाद पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

दरम्यान कोर्टाने म्हटलं आहे की, राज्यसभेचे सदस्य म्हणून राघव चड्ढा त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात सरकारी निवासस्थानावर ताबा ठेवण्याचा अधिकार आहे असं म्हणू शकत नाहीत. शासकीय निवासस्थानांचं वाटप हा त्यांना दिलेला विशेषाधिकार आहेत . मात्र आता आप खासदार राघव चड्ढा यांना तातडीने सरकारी बंगला रिकामा करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळं आता यावरून आप आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -