Friday, August 1, 2025
Homeसांगलीदरोडा टाकणारे तिघे गजाआड : पावणे दोन कोटीचा मुद्देमाल जप्त! इचलकरंजीतील एकाचा...

दरोडा टाकणारे तिघे गजाआड : पावणे दोन कोटीचा मुद्देमाल जप्त! इचलकरंजीतील एकाचा समावेश 

आंध्र प्रदेश मधील टकू गावात गलाई व्यावसायिकाच्या घरात सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या जिल्ह्यातील दोघांसह कोल्हापूर मधील एकास जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. दरोडा टाकणाऱ्या तिघा संशयितांना अटक करत पोलिसांनी त्यांच्याकडून लुटीतील सोन्यासह १ कोटी ७७ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सुरज बळवंत कुंभार ( वय ३३ रा. कुर्ली, ता. खानापूर), कैलास लालासो शेळके (वय ३० रा. बामणी ता. खानापूर) आणि सादिक ताजुद्दीन

शेख (वय ३५ रा. इचलकरंजी ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आंध्र प्रदेश पोलीस आणि सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सदरची संयुक्त कारवाई केली.

नामदेव गुरुनाथ देवकर (वय ४०) यांचा आंध्र प्रदेश मधील टनुकू गावात गलाई तसेच सोने तारणचा व्यवसाय आहे.

 

संशयित सुरज कुंभार हा देवकर यांच्याकडे गलाई कामगार म्हणून काम करत होता. दि. १२ सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास देवकर हे त्यांच्या पत्नीसोबत घरी असताना संशयित कुंभार याने त्याच्या इतर दोन साथीदारांसह त्यांच्या घरात घुसून त्यांना हत्याराचा धाक दाखवून हातपाय बांधून घरातील सोन्याचे दागिने, सोन्याचे बिस्कीट, रोख १ लाख रुपये असा मुद्देमाल जबरदस्तीने लुटून त्याची गाडी घेऊन पलायन केले होते. या घटनेची नोंद टनुकू पोलीस ठाण्यात झाली होती. सदर दरोड्याचा तपास करण्यासाठी आंध्र प्रदेश पोलीस सांगलीत दाखल झाले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि आंध्र प्रदेश पोलीस तांत्रिक माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेत होते.

 

यावेळी आंध्रप्रदेशचे पोलीस उपअधीक्षक सरथ राजकुमार, कॉन्स्टेबल अकबरलाल तसेच सांगली एलसीबीचे उपनिरीक्षक कुमार पाटील यांना माहिती मिळाली कि, संशयित तिघेजण विटा ते सांगली रोडवरील एका ढाब्याजवळ आले आहेत. मिळालेल्या माहिती प्रमाणे

एक पथक स्थापन करून त्याठिकाणी सापळा लावून संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी करत तपासणी केली असता त्यांच्या जवळ दरोड्यातील सोन्याचे दागिने मिळाले. यावेळी त्यांच्याकडून १ कोटी ७७ लाख ५९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, एक मोबाईल आणि २ हजार रुपये रोख असा एकूण १ कोटी ७७ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -