विषारी द्रव प्यायलेल्या सांगरुळ येथील विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आर्या सागर खाडे (वय १५) असे तिचे नाव आहे. या घटनेची नोंद करवीर पोलिसांत झाली आहे.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आर्या ही नववी इयत्तेत शिकत होती. दहा दिवसांपूर्वी शाळेतून घरी आल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता ती अभ्यास करण्यासाठी घरात बसली होती. दरम्यान, विषारी द्रव पिऊन ती पुन्हा अभ्यास करण्यासाठी बसली.थोड्यावेळाने तिला त्रास जाणवू लागल्यानंतर तिच्या वडिलांनी व कुटुंबातील सदस्यांनी उपचारासाठी तिला कोल्हापुरातील खासगी दवाखान्यात दाखल केले. शुक्रवारी (ता.२०) उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्या मागे आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.
विषारी द्रव प्यायलेल्या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू; शाळेतून घरी परतल्यानंतर अभ्यासाला बसली अन्..
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -