ताजी बातमी ऑनलाईन टीम
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी चाळीस दिवसांचा अल्टीमेटम दिला होता. आता तो अल्टीमेटम संपण्यासाठी तीन दिवस उरले आहेत. मात्र, त्याआधीच जरांगे पाटील रविवारी मराठा समाजासमोर आंदोलनाची दिशा मांडणार आहेत. चोवीस तारखेपर्यंत शांत राहायचं. कोणाच्या टीकेला उत्तर द्यायचं नाही. चोवीस ऑक्टोबरपर्यंत मराठा आरक्षण दिलं नाही तर गाठ मराठ्यांची आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा दिलाय. बावीस तारखेला म्हणजे उद्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला दिशा दिली जाणार आहे. पंचवीस ऑक्टोबरपासून आंदोलन कसं करायचं? हे मनोज जरांगे मराठा समाजाला सांगणार आहेत.
थोडीशी अधिकची मुदत देण्याची गरज आहे – मंत्री केसरकर
शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी वेळ वाढवून द्यावी अशी मागणी केलीय. आरक्षणासंदर्भात गठीत केलेल्या समितीला सरकारने तीस नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. हे आरक्षण मराठा समाजापर्यंत कसं इफेक्टीव्हली पोहोचेल. त्यांना स्वतंत्रपणे कशारीतीने आरक्षण देता येईल? जे सुप्रीम कोर्टात टिकेल ते देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजितदादा सगळे कटिबद्ध आहोत. आम्हीसुद्धा कटिबद्ध आहोत. पाटील यांच्याबरोबर आहोत. निश्चितपणे थोडीशी श्रद्धा सबुरी बाळगली. तर या प्रकरणाचा सुद्धा शेवट अतिशय गोड होईल असे केसरकर म्हणाले.
तुम्ही तुमची तयारी करा. मराठे, मराठ्यांची तयारी करणार’; कसे असेल पुढचे आंदोलन? काय म्हणाले जरांगे पाटील
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -