Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंगसणासुदीत बँकांना असणार 'एवढ्या' दिवस सुट्या, पाहा संपूर्ण यादी

सणासुदीत बँकांना असणार ‘एवढ्या’ दिवस सुट्या, पाहा संपूर्ण यादी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या कॅलेंडरनुसार, नोव्हेंबर 2023 मध्ये वीकेंडसह बँका 15 दिवस बंद राहतील. या सुट्यांमध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारचाही समावेश आहे. तसेच रविवारची सुट्टीही असणार आहे. जर तुम्ही पुढील महिन्यात बँकेशी संबंधित काम करण्याचा विचार करत असाल तर आधी RBI चे कॅलेंडर तपासा.

 

नोव्हेंबर महिन्यात बँका 15 दिवस बंद राहतील. यामध्ये दिवाळी, गोवर्धन पूजा , छठ पूजा इत्यादी सणांच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. याशिवाय शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही यात समावेश करण्यात आला आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये या दिवशी बँका बंद राहतील

1 नोव्हेंबर 2023- कन्नड राज्योत्सव बेंगळुरू, इंफाळ आणि शिमला येथे बँका बंद राहतील.

5 नोव्हेंबर 2023- रविवारची सुट्टी

10 नोव्हेंबर 2023- गोवर्धन पूजा/लक्ष्मी पूजा/दिवाळीनिमित्त बँका बंद राहतील.

11 नोव्हेंबर 2023- दुसरा शनिवार

12 नोव्हेंबर 2023- रविवार

13 नोव्हेंबर 2023- लक्ष्मी पूजा/दिवाळी मुळे आगरतळा, डेहराडून, गंगटोक, इंफाळ, जयपूर, कानपूर, लखनौ येथील बँकांना सुट्टी असेल.

 

14 नोव्हेंबर 2023- अहमदाबाद, बेलापूर, बेंगळुरू, गंगटोक, मुंबई, नागपूर येथील बँकांना दिवाळी/ लक्ष्मीपूजनामुळे सुट्टी असेल.

15 नोव्हेंबर 2023- गंगटोक, इंफाळ, कानपूर, कोलकाता, लखनौ आणि शिमला येथे भाई दूज/चित्रगुप्त जयंती/निंगल चक्कूबा/भ्रात्री द्वितीया मुळे बँका बंद राहतील.

19 नोव्हेंबर 2023- रविवारची सुट्टी

20 नोव्हेंबर 2023- पाटणा आणि रांचीमध्ये छठनिमित्त बँका बंद राहतील.

23 नोव्हेंबर 2023- सेंग कुट स्नेम/इगास बागवालमुळे डेहराडून आणि शिलाँगमध्ये बँका बंद राहतील.

25 नोव्हेंबर 2023- चौथा शनिवार

26 नोव्हेंबर 2023- रविवार

27 नोव्हेंबर 2023- गुरु नानक जयंती / कार्तिक पौर्णिमेमुळे, अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, इंफाळ, कोची, पणजी, पाटणा, त्रिवेंद्रम आणि शिलाँग वगळता संपूर्ण देशात बँका बंद राहतील.

30 नोव्हेंबर 2023- कनकदास जयंतीनिमित्त बंगळुरूमध्ये बँका बंद राहतील.

 

ऑनलाइन व्यवहार चालू राहणारदेशातील अनेक सणांमुळे काही शहरांमध्ये बँका बंद राहणार आहेत. मात्र, बँकिंग सेवा खंडित होणार नाही. ऑनलाइन व्यवहार करता येणार आहेत. बँकाच्या सुट्टीच्या तारखा तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइट www.rbi.org.in आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -