आयसीसी विश्वचषकातल्या 27 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पाच धावांनी पराभव केला. हिमाचल प्रदेशच्या धरमशाला क्रिकेट स्टेडिअमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिली फलंदाजी करताना 49.2 षटकात 388 धावांचा डोंगर उभा केला. याला न्यूझीलंडने तोडीसतोड उत्तर दिलं. न्यूझीलंडने 50 षटकात 383 धावा केल्या, पण अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात न्यूझीलंडचा पाच धावांनी पराभव झाला. रचिन रविंद्रने शतकी खेळी करत न्यूझीलंडच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले, पण त्याची खेळी व्यर्थ गेली.
ऑस्ट्रेलिया सेमीफायनलच्या दिशेने
पहिल्या दोन सामन्यात पराभव पत्कराव्या लागल्या ऑस्ट्रेलियाने स्पर्धेत जबरदस्त कमबॅक केला आहे. ऑस्ट्रेलियाने सलग चार सामने जिंकत सेमीफायनलच्या दिशेने मजबूत पाऊल टाकलं आहे. चार विजयासह ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 8 पॉईंट जमा झाले असून चौथ्या क्रमांकावर आहेत. न्यूझीलंडलाही सहा सामन्यात 2 पराभव स्विकारावे लागले आहेत. न्यूझीलंडच्या खात्यातही आठ पॉईंट जमा असून ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
हरले पण शेवटपर्यंत लढले! न्यूझीलंडचा पाच धावांनी पराभव… ऑस्ट्रेलिया सेमीफायलनच्या दिशेने
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -