ताजी बातमी ऑनलाईन टीम
मराठा आरक्षणासाठी आता निकराची लढाई सुरु झालीय, राज्यभर हिंसक आंदोलन होतायंत..त्यातच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वपक्षीय आमदारांनी मंत्रालयालाच टाळं ठोकलं. या आमदारांनी मंत्रालयाच्या पाय-यांवरच आंदोलन केलं. मंत्रालयाच्या गेटला कुलुप लावत सर्वपक्षीय आमदारांनी विशेष अधिवेशनाची मागणी केली.
राजू नवघरे, अमोल मिटकरी, राहुल पाटील, कैलास पाटील, विक्रम काळे, चेतन तुपे, बाबासाहेब आजबे, यशवंत माने, निलेश लंके, बाळासाहेब पाटील, दिलीप बनकर, बाबाजाणी दुर्रानी, मोहन उबर्डे, शेखर निकम राजेश पाटील या आमदारांनी ठोकलं मंत्रालयाला टाळं ठोकले.
या आमदारांनी मंत्रालयाला टाळं ठोकत जोरदार घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे आमदार या आंदोलनात सामील झाले होते. मराठा आरक्षणासाठी मंत्रालयाला टाळं ठोकणा-या सर्वपक्षीय आमदारांना आझाद मैदान पोलिसांनी ताब्यात घेतलं. तासाभरानंतर पोलिसांनी सर्व आमदारांची सुटका केली.
मराठा आरक्षणासाठी मंत्रालयाच्या गेटला आमदारांनीच ठोकलं टाळं
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -