वर्ल्डकपच्या महासंग्रामातील 33 वा सामना भारत विरुद्ध श्रीलंका आज 2 नोव्हेंबर 2023 ला पार पडणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आत्तापर्यंत सहा सामन्यांमध्ये विजय मिळवून भारतीय संघाचे दमदार कामगिरी केली आहे. या सामन्यात विराट कोहलीच्या खेळीवर सर्वांचं लक्ष लागणार आहे. कारण कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत 48 शतके झळकावली आहेत. त्यामुळे कोहलीला सचिन तेंडुलकरच्या या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे.
कधी रंगणार भारत विरुद्ध श्रीलंका सामना?
▪️गुरुवार, 2 नोव्हेंबर 2023
▪️वानखेडे स्टेडियम मुंबई
किती वाजता सुरू होणार सामना?
▪️दुपारी 2 वाजता; अर्धा तास आधी नाणेफेक होईल.
लाईव्ह प्रक्षेपण कुठं पाहता येईल?
स्टार स्पोर्ट्स नेटवर्क टीव्ही चॅनेल
सामना मोबाईलवर कुठं पाहता येईल?
Disney+Hotstar