धनत्रयोदशी 2 नोव्हेंबर 2021 रोजी साजरी केला जाणार आहे. दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीपासून होते. धनत्रयोदशीला भगवान धन्वंतरी आणि यमराज यांची विशेष पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी धनाची देवता कुबेर, माता लक्ष्मी, धन्वंतरी आणि यमराज यांची पूजा केली जाते. या दिवशी सोने, चांदी किंवा भांडी खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी लोकांनी राशीनुसार काय खरेदी करावी जाणून घेऊया.
मेष : या राशीचे लोक धनत्रयोदशीला सोन्या-चांदीचे दागिने किंवा नाणी, भांडी, कपडे इत्यादी खरेदी करू शकतात.
वृषभ : या राशीच्या लोकांनी सोने, चांदी, पितळ, संगणक, भांडी, केशर, चंदन इत्यादी वस्तू खरेदी कराव्यात.
मिथुन : या राशीच्या लोकांनी जमीन, घर, सोने, चांदी इत्यादी वस्तू खरेदी कराव्यात.
कर्क : या राशीच्या लोकांनी सोने-चांदी, नवीन वाहन किंवा दागिने खरेदी करावेत.
सिंह : या राशीचे लोक नवीन वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सोने-चांदी, जमीन, तांबे-पितळाची भांडी किंवा फर्निचर खरेदी करू शकतात.
कन्या : या राशीचे लोक जमीन, घर, अन्नधान्य इत्यादी खरेदी करू शकतात.
तूळ : या राशीच्या लोकांना काही आवश्यक खरेदी करायची असेल तर ते कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावावर करू शकतात.
वृश्चिक : या राशीचे लोक सोने-चांदी, भांडी, पितळ, कपडे खरेदी करू शकतात.
धनु : या राशीचे लोक स्थावर मालमत्ता, मौल्यवान धातू खरेदी करू शकतात.
मकर : या राशीचे लोक या दिवशी घरासाठी आवश्यक असलेली कोणतीही वस्तू खरेदी करू शकतात.
कुंभ : हे लोक पुस्तके, वाहने, फर्निचर आणि घरातील आवश्यक वस्तू खरेदी करू शकतात.
मीन : या लोकांसाठी सोने, चांदी, रत्ने इत्यादी वस्तूंच्या खरेदीसाठी दिवस शुभ आहे.
आजच्या धनत्रयोदशीला राशीनुसार खरेदी करा या वस्तू : मिळतील शुभ परिणाम
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -