Saturday, January 17, 2026
Homeकोल्हापूरडोक्यात दगड घालून मित्रांनीच केला तरुणाचा निर्घृण खून! दोघे ताब्यात

डोक्यात दगड घालून मित्रांनीच केला तरुणाचा निर्घृण खून! दोघे ताब्यात

निर्माण चौक येथील मैल खड्डा परिसरात शुभम अशोक पाटील (वय ३०, रा. रामानंदनगर, कोल्हापूर) याच्या डोक्यात दगड घालून दोन मित्रांनी निर्घृण खून केला. ही घटना बुधवारी (दि.२९) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी संशयित हल्लेखोर संग्राम पाडळकर (रा. पाडळकर चौक, हॉकी स्टेडियम जवळ, कोल्हापूर) आणि बंडा मोरे (रा. नेहरूनगर, कोल्हापूर) या दोन संशयितांना जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, शुभम पाटील हा बुधवारी रात्री मैल खड्डा परिसरात त्याच्या दोन मित्रांसह बसला होता. अज्ञात कारणावरून त्यांच्यात वाद झाला. त्याच वादातून पाडळकर आणि मोरे या दोघांनी डोक्यात दगड घालून शुभमचा निर्घृण खून केला. पहाटेच्या सुमारास याची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून शुभम पाटील याच्या मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये पाठवला.

पोलिसांच्या दुसऱ्या पथकाने संशयित हल्लेखोर संग्राम पाडळकर आणि बंडा मोरे यांना ताब्यात घेतले. याबाबत मृत शुभम याचे वडील अशोक भीमाशंकर पाटील (रा. रामानंद नगर, कोल्हापूर) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -