निकालाच्या दोन दिवस आधी मिझोरममधील मतमोजणी एक दिवस पुढे अर्थात ४ तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आली. मात्र, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड व तेलंगणा या चार राज्यांमध्ये आजच मतमोजणी होत असून काँग्रेस व भाजपा या दोन प्रमुख राष्ट्रीय पक्षांमधली ही लढत पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम मानली जात आहे. एग्झिट पोलमध्ये भाजपाला झुकतं माप मिळालं असलं, तरी राजस्थानमध्ये अँटि इन्कम्बन्सीचा फायदा भाजपाला होतो की काँग्रेस सत्ता राखते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.