Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगशपथविधीपूर्वीच रेवंत रेड्डी Wikipedia वर तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री म्हणून झळकले

शपथविधीपूर्वीच रेवंत रेड्डी Wikipedia वर तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री म्हणून झळकले

 

तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये कॉंग्रेसने आघाडी घेतली असून, सत्ताधारी भारत राष्ट्र समितीपेक्षा काँग्रेस पुढे आहे. अद्याप अंतिम निकाल येणे बाकी असतानाच, (Wikipedia ) विकिपीडियावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून झळकले आहेत.

 

रेवंत रेड्डी यांच्या (Wikipedia ) विकिपीडिया पृष्ठावरील अपडेटमध्ये असे लिहिले की, “अनुमुला रेवंत रेड्डी (जन्म 8 नोव्हेंबर 1967) तेलंगणातील एक भारतीय राजकारणी असून, ते तेलंगणाचे 2 रे मुख्यमंत्री म्हणून काम करणार आहेत.”

 

 

असे असले तरी आपल्याना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण संपूर्ण निकाल येणे अजून बाकी आहे. त्यामुळे अतिउत्साही विकीपीडिया संपादकाची भविष्यवाणी खरी ठरते की नाही हे पहाणे औत्सुकाचे ठरणार आहे. सध्या रेड्डी आघाडीवर असल्याचे दिसते. कामारेड्डी येथे प्रतिष्ठेच्या लढतीत ते सध्या केसीआरविरुद्ध आघाडीवर आहेत.तत्पूर्वी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयपाल रेड्डी यांच्या भाचीशी लग्न झालेल्या रेवंत रेड्डी यांनी मुख्यमंत्री केसीआर यांचा मुलगा केटीआर यांची खिल्ली उडवत म्हणाले होते की, मी “मेरिट कोट्या”तून इथपर्यंत पोहचलो आहे. तर आणि केटीआर “व्यवस्थापन/एनआरआय कोट्यातून” आले आहेत.

 

आपल्या राजकीय कुशाग्रतेने रेवंत रेड्डी काँग्रेसमध्ये सामील झाल्यानंतर एका वर्षातच प्रदेश काँग्रेसच्या तीन कार्यकारी अध्यक्षांपैकी एक बनले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मलकाजगिरी मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि TRSचा पराभव करत पहिल्यांदाच संसदेत पोहोचले.

 

जून २०२१ मध्ये काँग्रेस हायकमांडने त्यांना ज्येष्ठ नेते एन. उत्तम रेड्डी यांच्या जागी तेलंगणाची कमान सोपवली. तेव्हापासून त्यांनी पक्ष बांधनी करत कॉंग्रेसला सत्तेपर्यंत आणून पोहचवले आहे.

 

 

जवळपास दोन दशकांच्या राजकीय कारकिर्दीत रेवंत रेड्डी यांच्या नावाशी अनेक वाद जोडले गेले आहेत. कॅश फॉर व्होट प्रकरणात तुरुंगात गेल्यावर रेवंत वादात सापडले होते.

 

खरे तर विधान परिषदेच्या निवडणुकीत पैसे देऊन मते विकत घेतल्याचा आरोप त्यांच्यावर होता. त्यामुळे ते काही महिने तुरुंगातही होते.

 

सध्याच्या निवडणुकीतही पैसे घेऊन पक्षाचे तिकीट दिल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. याची केवळ काँग्रेसमध्येच नाही तर बाहेरही चर्चा आहे. तेलंगणा सरकारमधील मंत्री केटीआर यांनी उपहासात्मकपणे विचारले होते की, रेड्डी तिकिटाचा दर काय आहे?

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -