ताजी बातमी ऑनलाईन टीम
अंडर 19 आशिया कप 2023 स्पर्धेत क्रिकेट टीम इंडियाने पाकिस्तानला विजयासाठी 260 धावांचं आव्हान दिलं आहे. टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 259 धावा केल्या. पाकिस्तानने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाकडून या सामन्यात मराठमोळ्या बीडच्या सचिन धस, आदर्श सिंह आणि आणि कॅप्टन उदय सहारन या त्रिकुटाने प्रत्येकी अर्धशतकी खेळी केली. मात्र इतर फलंदाजांना विशेष योगदान देता आलं नाही. तर पाकिस्तानला भेदक माऱ्याच्या जोरावर टीम इंडियाला 300 आधी रोखण्यात यश आलं. पाकिस्तानकडून मोहम्मद जीशान याने सर्वोत्तम बॉलिंग केली. मात्र सचिन धसच्या कचाट्यातून कुणीच वाचू शकला नाही.
टीम इंडियाची बॅटिंग
- आदर्श सिंह आणि अर्शिन कुलकर्णी या सलामी जोडीने 39 धावांची भागीदारी केली. अर्शिन कुलकर्णी 24 धावा करुन आऊट झाला. आदर्शने 81 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 4 चौकारांच्या मदतीने 62 धावा केल्या. रुद्र पटेल 1 रन करुन आऊट झाला. तर कॅप्टन उदय सहारन याने टीम इंडियाचा डाव सावरला. उदयने 98 बॉलमध्ये 60 रन्स केल्या