Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगश्रेयस तळपदेच्या प्रकृतीबाबत पत्नी दिप्तीकडून मोठी अपडेट; म्हणाली..

श्रेयस तळपदेच्या प्रकृतीबाबत पत्नी दिप्तीकडून मोठी अपडेट; म्हणाली..

 

 

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गुरुवारी संध्याकाळी शूटिंगवरून घरी परतल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यानंतर श्रेयला अंधेरीतल्या बेलेव्यू रुग्णालयात दाखल करण्यात आलं. श्रेयसला हृदयविकाराचा झटका आला असून त्याच्यावर अँजियोप्लास्टी करण्यात आली. त्याच्या प्रकृतीबद्दल चाहते काळजी व्यक्त करत आहेत. आता श्रेयसची पत्नी दिप्ती तळपदेनं सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याच्या तब्येतीचे अपडेट्स दिले आहेत. श्रेयसची प्रकृती स्थिर असून काही दिवसांतच त्याला डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचं तिने सांगितलं आहे.दिप्ती तळपदेची पोस्ट-

‘माझ्या पतीने नुकत्याच अनुभवलेल्या प्रकृतीच्या समस्येनंतर अनेकांनी काळजी व्यक्त केली. तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी अनेकांनी प्रार्थना केल्या. त्या सर्वांबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. आता त्याची प्रकृती स्थिर आहे आणि काही दिवसांतच त्याला डिस्चार्ज देण्यात येईल. या काळात वैद्यकीय टीमने वेळेवर आणि तातडीने उपचार केले. त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. श्रेयसच्या प्रकृतीत सुधारणा होत असताना आम्ही काही गोष्टी खासगी ठेवू इच्छितो, त्याचा तुम्ही आदर करावा अशी मी विनंती करते. तुमची भक्कम पाठिंबा हा आम्हा दोघांसाठी प्रचंड ताकदीचा स्रोत आहे,’ अशी पोस्ट दिप्तीने लिहिली आहे.वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाचं शूटिंग संपवून घरी परतलेल्या श्रेयसला श्वास घेण्यास त्राण जाणवू लागल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याला हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्याच्यावर अँजियोप्लास्टी करण्यात आल्याची माहिती समोर आली. काही वेळापूर्वी अभिनेता अक्षय कुमारनेही श्रेयसची रुग्णालयात भेट घेतली. दहा मिनिटं तो बेलेव्यू रुग्णालयात होता आणि यावेळी त्याने श्रेयसच्या प्रकृतीची विचारपूस केली. ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटासाठी श्रेयस आणि अक्षय सोबत शूटिंग करत होते.

 

‘वेलकम टू द जंगल’ हा ‘वेलकम’ या फ्रँचाइजीमधील तिसरा चित्रपट आहे. याचं दिग्दर्शक अहमद खान करतोय. या चित्रपटात श्रेयससोबतच अक्षय कुमार, दिशा पटानी, सुनील शेट्टी, परेश रावल, रवीना टंडन, जॅकलीन फर्नांडिस, संजय दत्त, राजपाल यादव, किकू शारदा, दलेर मेहंदी, मिका सिंग, राहुल देव, मुकेश तिवारी, शारीब हाश्मी, झाकीर हुसैन आणि यशपाल शर्मा यांच्या भूमिका आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -