Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगमुकेश अंबानी यांच्यानंतर रतन टाटा यांना धमकी, धमकी देणार कोण?

मुकेश अंबानी यांच्यानंतर रतन टाटा यांना धमकी, धमकी देणार कोण?

 

देशातील प्रसिद्ध उद्योगपतींना धमकी देण्याचे प्रकार वाढत आहे. रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना यापूर्वी धमक्यांचे फोन आले होते. आता टाटा समूहाचे मानद चेअरमन रतन टाटा यांना धमकीचा फोन आला आहे. धमकी देणाऱ्याने ‘रतन टाटा यांची सुरक्षा वाढवून टाका, अन्यथा त्यांचे हाल सायरस मिस्त्री सारखे होईल’, या शब्दांत फोनवरुन धमकी दिली. धमकीच्या या कॉलनंतर मुंबई पोलीस अलर्ट झाले. पोलिसांनी आपल्या एका टीमला रतन टाटा यांच्या सुरक्षकडे लक्ष ठेवण्याचे काम दिले तर दुसऱ्या टीमने फोन करणाऱ्याचा शोध सुरु केला. मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याची माहिती मिळाली आहे.फोन आला आणि तपास सुरु झाला

मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमचा फोन खणाणला. फोन करणाऱ्याने रतन टाटा यांची सुरक्षा वाढवा, अन्यथा त्यांचे सायरस मिस्त्री होईल, असे सांगितले. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन ही माहिती वरिष्ठांना देण्यात आली. पोलिसांनी फोन कोठून आला, त्याचा तपास सुरु केला. पोलिसांनी धमकी देणाऱ्या कॉलरशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा फोन बंद होता. त्यानंतर पोलिसांनी त्याचे लोकेशन शोधले. तो कर्नाटकातील असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या घरी गेल्यानंतर पाच दिवसांपासून ते बंद असल्याचे सांगितले. त्या व्यक्तीचा पत्ता शोधला असता फोन करणारा पुणे येथील रहिवासी असल्याचे समोर आले. हा आरोपी मनोरुग्ण असल्याचे समोर आले.अंबानी यांना मिळाली होती धमकी

रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनाही यापूर्वी धमकी मिळाली होती. एका ईमेल मार्फत त्यांना ही धमकी देण्यात आली. त्यांच्याकडून वीस कोटी रुपये मागण्यात आले. पोलिसांना या आरोपीला अटक केली होती. 27 ऑक्टोबर रोजी मुकेश अंबानी यांनी ही धमकी मिळाली होती. यापूर्वी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही एका व्यक्तीने दक्षिण मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलला फोन केला होता. त्याने रुग्णालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -