प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कधी ना कधी पैशाची गरज असते. कधी कधी कोणाच्या घरी लग्न, आजारपण किंवा मुलाच्या शिक्षणासाठी अचानक मोठा खर्च होतो. अशा परिस्थितीत बहुतेक लोक त्यांच्या मित्र किंवा नातेवाईकांकडून मदत मागतात. काही लोक पगारही आगाऊ घेतात, पण या सगळ्यानंतर ते अधिकच अडचणीत येतात कारण एकतर त्यांना उधार घेतलेले पैसे एकाच वेळी परत करावे लागतात किंवा पगारावर घेतलेल्या आगाऊ रक्कम कपातीमुळे घराचा मासिक खर्च भागवणं कठीण होतं. अशा परिस्थितीत लोक कर्जाच्या जाळ्यात अडकतात.देशातील सर्वात मोठी बँक आता अशी ऑफर घेऊन आली आहे. ज्यामध्ये तुम्हाला पैसेही मिळतील आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणीत पडावं लागणार नाही. मग तुम्ही बँकेला हप्त्यांमध्ये पैसे परत करू शकाल आणि तेही अगदी कमी व्याजदराने.
SBI बँकेनं ग्राहकांसाठी पर्सनल लोनवर ऑफर आणली आहे. ही ऑफर 31 जानेवारी 2024 पर्यंत आहे. या ऑफरची खास गोष्ट अशी आहे की तुम्हाला कर्ज देण्यासाठी कोणत्याही गॅरेंटरची गरज नाही किंवा बँक तुम्हाला कोणतेही प्रोसेसिंग शुल्क आकारणार नाही.या कालावधीत बँक तुमच्याकडून कोणतेही छुपे शुल्क आकारणार नाही. या कर्जासाठी तुमच्याकडे 6 महिन्यांची सॅलरी स्लिप, 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट, आधार कार्ड, पॅन कार्ड, कंपनीचा ओळखपत्र असणं आवश्यक आहे. या कर्जाची आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे तुम्हाला ते कमी होणार्या व्याजदराने मिळेल.
तुम्हाला किती कर्ज मिळेल?
SBI नुसार, हे कर्ज घेण्यासाठी तुमचा मासिक पगार किमान 15 हजार रुपये असावा. तुमचे वय 21 ते 58 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. या ऑफर अंतर्गत बँक तुम्हाला 24 हजार ते 20 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज देईल. हे कर्ज 1 वर्ष ते 7 वर्षांच्या कालावधीसाठी दिले जाईल. यासाठी तुमचा क्रेडिट स्कोअर 750 आणि त्याहून अधिक असावा.
यासाठी तुम्ही बँकेच्या वेबसाइटवरील कर्जाच्या पर्यायावर जाऊन तुमची सर्व माहिती देऊ शकता आणि सर्व आवश्यक कार्यवाही केल्यानंतर बँक तुम्हाला 5 दिवसांच्या आत कर्ज देईल.