देशभरात आकर्षक लूक आणि आपल्या वेगामुळे लोकप्रिय झालेली वंदे भारत रेल्वे महाराष्ट्रातून पाच ठिकाणी धावत आहे. आता महाराष्ट्राला सहावी रेल्वे मिळाली आहे. वंदे भारत लवकरच मराठवाड्यातून धावणार आहे. मध्य रेल्वेला वंदे भारतचे रॅक मिळाले असून मुंबई ते जालना दरम्यान ही रेल्वे धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या रेल्वेला ३० डिसेंबर रोजी हिरवा झेंडा दाखवणार आहे. वंदे भारत रेल्वे अयोध्या-आनंद विहार, नवी दिल्ली-वैष्णवो देवी, अमृतसर-नवी दिल्ली, जालना-मुंबई आणि कोइंबतूर-बंगळूरु येत्या ३० तारखेपासून धावणार आहे.
तसेच पूल-पूश तंत्रज्ञान असलेली अमृत भारत नावाच्या दोन रेल्वे देशात प्रथमच धावणार आहेत. महाराष्ट्राला मिळाली सहावी रेल्वे महाराष्ट्रात पहिली वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई ते गांधीनगर सुरु झाली होती. सहा दिवस धावणारी या रेल्वेला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर मुंबई ते सोलापूर, मुंबई ते साईनगर शिर्डी, मुंबई ते गोवा आणि नागपूर ते बिलासपूर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाल्या. आता ३० डिसेंबरपासून मुंबई ते जालना ही रेल्वे सुरु होणार आहे.
प्रवासाचा कमी वेळ, चांगल्या सुविधा आणि वाजवी भाडे यामुळे विमान प्रवासापेक्षा अनेक जण वंदे भारत एक्स्प्रेसला प्राधान्य देत आहेत. अमृत भारत रेल्वे प्रथमच दाखवणार अमृत भारत रेल्वे नवी दिल्ली ते दरभंगा दरम्यान धावणार आहे. तसेत दुसरी गाडी मालदा-बंगळूरु दरम्यान चालवण्यात येणार आहे. श्रमिक कामगारांना लक्षात ठेऊन ही गाडी सुरु केली आहे. या रेल्वे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, दिल्ली, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र या राज्यातून सुरु करण्यात येणार आहे. तसेच अमृत भारत रेल्वे एसी-1,2,3 कोच असलेलीही धावणार आहे. राजधानी-शताब्दी एक्स्प्रेसप्रमाणे या गाडीचा वेग जास्तीत जास्त 130 किमी असणार आहे.
पूल-पूश तंत्रज्ञान असल्यामुळे राजधानी-शताब्दीपेक्षा अधिक वेग या गाडीचा असणार आहे. अमृत भारत ट्रेनचा तिकीट दर सामान्य रेल्वे पेक्षा 10-15 टक्के अधिक असणार आहे.