Friday, July 4, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजीत इंडिया आघाडीच्यावतीने निदर्शने

इचलकरंजीत इंडिया आघाडीच्यावतीने निदर्शने

संसदेच्या सुरक्षेबाबत देशाचे गृहमंत्री व प्रधानमंत्री यांनी लोकसभेत व राज्यसभेत निवेदन करावे अशी मागणी करणाऱ्या लोकसभा व राज्यसभेतील १४६ खासदारांना तडकाफडकी निलंबित केले व ५ युवकांना संसदेत प्रवेश देणार्या भाजप खासदारांवर मात्र कोणतीच कारवाई केली नाही. भाजपच्या या लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या व हुकुमशाहीकडे वाटचाल करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी इचलकरंजी शहरातील इंडीया आघाडीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याजवळ निदर्शने करून तीव्र निषेध करण्यात आला.

या निदर्शनामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उबाठा), भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, श्रमिक संघटना, लाल निशान पक्ष, समाजवादी पक्ष, राष्ट्रसेवा दल इत्यादीनी सहभाग घेतला. यावेळी मदन कारंडे, सयाजी चव्हाण, कॉ. दत्ता माने, जयकुमार कोले, वसंत कोरवी, भाई शिवाजी साळुंखे, सुनिल बारवाडे, शशांक बावचकर, प्रताप होगाडे यांनी मनोगत व्यक्त करताना भाजप सरकारच्या हुकुमशाही प्रवृत्तीचा निषेध केला. यावेळी इंडीया आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -