अनेकदा सोशल मीडियावर आपण काही युझर्सची नावं चार शब्दांची पाहतो. काहीजण आपल्या आईचं आणि वडिलांचं नाव देखील आपल्या नावात लावतात. तर गेल्या काही दिवसात अधिकृत कागदपत्रांवर देखील आई आणि वडिलांचं नाव संपूर्ण नावात लावण्याचा कल तरुणाईमध्ये दिसून येतोय. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये एक मोठी घोषणा केली आहे. मुलांमुलीच्या नावामध्ये आधी आईचं नाव लावणार नंतर वडिलांचं नाव असेल, अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे.
आपण महिलांना संधी दिली. आपण चौथं महिला धोरण आणलं. महिला मंत्री असल्याने तिलाही त्यातील माहिती होती. तुम्हाला लवकरच काही माहिती मिळेल. आधी अजित अनंतराव पवार असं नाव दिलं जायचं. आता इथून पुढं आधी मुलाचं किंवा मुलीचं नाव, नंतर आईचं नाव, त्यानंतर वडिलांचं नाव आणि मग आडनाव असं संपूर्ण नाव असणार आहेत, अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे.