अरबाज खान आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. नुकताच, अरबाज खान याने 41 वर्षीय मेकअप आर्टिस्ट शूरा खान हिच्यासोबत लग्न केलं. अरबाज खान याने दुसरं लग्न केल्यानंतर मलायका हिच्या देखील दुसऱ्या लग्नाची चर्चा रंगली आहे.अशात नुकताच झालेल्या एका मुलाखतीत दुसऱ्या लग्नाबद्दल मलायका हिने मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे मलायका स्वतःच्या दुसऱ्या लग्नासाठी तयार झाली आहे… अशी चर्चा रंगली आहे…
सांगायचं झालं तर, मलायका सध्या ‘झलक दिखला जा 11’ शोमध्ये परीक्षकाची भूमिका साकारत आहे. शोमध्ये फाराह खान लग्नाच्या विषयावर मलायका हिला विचारते. फराह विचारते ‘तू सिंगल मदर आणि अभिनेत्री पासून डबल पॅरेंट आणि अभिनेत्री होणार आहेस?’ यावर मलायका म्हणते, ‘म्हणजे मला पुन्हा कोणाला दत्तक घ्यावं लागेल…’पुढे गौहर खान मलायका हिला म्हणते, ‘म्हणजे तू दुसरं लग्न करणार आहेस का?’ यावर मलायका म्हणते ‘100 टक्के लग्न करण्यासाठी तायर आहे. जर कोणी मला लग्नासाठी विचारेल, तेव्हा दुसऱ्या लग्नासाठी तयार होईल असं अभिनेत्री म्हणाली…’ मलायका हिने असं वक्तव्य केल्यानंतर पुन्हा अर्जुन कपूर याच्यासोबत असेल्या नात्याची चर्चा रंगत आहे.
अभिनेता अरबाज खान याच्यासोबत घटस्पोट झाल्यानंतर मलायका हिच्या आयुष्यात अभिनेता अर्जुन कपूर याची एन्ट्री झाली. गेल्या अनेक वर्षांपासून अर्जुन आणि मलायका एकमेकांना डेट करत आहेत. एवढंच नाही तर, दोघांनी सर्वांसमोर त्यांच्या नात्याची कबूली देखील दिली आहे. पूर्वी मलायका आणि अर्जुन यांना वयाच्या अंतरावरुन ट्रोल करण्यात आलं होतं.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका हिच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा रंगली आहे. 2024 मध्ये मलायका नव्या आयुष्याला सुरुवात करेल का? अशी देखील चर्चा रंगली आहे. अभिनेत्री शोमध्ये दुसरं लग्न करणार असं सांगितलं पण मलायका हिने अर्जुन याचं नाव घेतलं नाही.
मलायका कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील मलायका हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. मलायका सोशल मीडियावर कायम सक्रिय देखील असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते