Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगराज्यभरातील पेट्रोल पंप बाहेर रांगाच रांगा…; नवीन मोटारवाहन कायद्याविरोधात ट्रक चालकांचा संप

राज्यभरातील पेट्रोल पंप बाहेर रांगाच रांगा…; नवीन मोटारवाहन कायद्याविरोधात ट्रक चालकांचा संप

 

 

केंद्र सरकारच्या नवीन वाहन कायद्याविरोधात ट्रक चालकांचा संप सुरु आहे. पुणे शहर,पिंपरी चिंचवड,ग्रामीण भागातील पेट्रोल-डिझेल पंपवर तुरळक गर्दी पाहायला मिळतेय. काल पुणे जिल्हा पेट्रोल-डिझेल असोसिएशने जिल्ह्यातील कुठलाही पंप बंद राहणार नसल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे इतर जिल्ह्याच्या तुलनेत पेट्रोल पंपवर तुरळक गर्दी पाहायला मिळत आहे.

ट्रकचालक संपाचा परिणाम पेट्रोल आणि डिझेल पुरवठ्यावरही होत आहे. अमरावतीमध्ये पेट्रोल पंपावर लागल्या पहाटे पासूनच वाहनाच्या रांगा लागल्यात. अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध नसल्याने रुग्णवाहिका, स्कूल बस तसेच सर्वसामान्यांवर मोठा परिणाम होत आहे.

सोलापुरात पेट्रोल पंपावर सकाळपासून वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. पेट्रोल पंप बंद असल्याच्या चर्चेने नागरिकांनी काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर रांगा लावल्या आहेत. मोटार वाहन कायद्याच्या विरोधात वाहन चालकांनी केलेल्या संपामुळे हा गोंधळ उडाल्याच पाहायला मिळत आहे.

मनमाडच्या पानेवाडीत येथील पेट्रोल, डिझेल वाहतूक ठप्प आहे. पुरवठा कंपनीची चालक आपल्या संपावर ठाम आहेत. कोणत्याही परिस्थितीत गाड्या काढणार नसल्यावर चालकांचं एकमत आहे. केंद्र सरकारने केलेला कायदा रद्द करण्याची मागणी चालकांनी केली आहे.

कोल्हापुरात इंधन वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी पुकारलेला अखेर रात्री उशिरा मागे घेतला आहे. सरकारच्या वाहतूक धोरणा विरोधात वाहनधारकांनी संपाची घोषणा केली होती. या संपामुळे काल रात्री राज्यभरातील अनेक पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या रांगा लागल्या होत्या

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -