Monday, December 23, 2024
Homeक्रीडाप्रो कब्बडी लीगमध्ये 12 संघात प्लेऑफसाठी जोरदार चुरस, दिल्ली दबंग जोमात पण...

प्रो कब्बडी लीगमध्ये 12 संघात प्लेऑफसाठी जोरदार चुरस, दिल्ली दबंग जोमात पण यु मुंबा कोमात

 

मुंबई : प्रो कब्बडीच्या दहाव्या पर्व सुरु असून स्पर्धेचा मध्यान्ह्य पार पडला असंच म्हणावं लागेल. प्रत्येक संघाला एकूण 22 सामने खेळायचे त्यापैकी जवळपास प्रत्येक संघाने 11 सामने खेळले आहेत. त्यामुळे गुणतालिकेत मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. प्रत्येक सामन्याचं महत्त्व वाढलं एक जयपराजय अंतिम फेरीचं गणित ठरवणार आहे. प्रो कब्बडी लीगमध्ये सर्वाधिक पटणा पायरेट्सने तीन वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. तर जयपूर पिंक पँथरने दोन वेळा ही किमया साधली आहे.

तर यु मुंबा, बंगळुरु बुल्स, बंगाल वॉरियर्स, दबंग दिल्लीने प्रत्येकी एक वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. त्यामुळे यंदाच्या जेतेपदावर कोण नाव कोरणार याची उत्सुकता आहे. दिवसाला दोन सामने खेळवले जातात. त्यामुळे 12 संघांच्या गुणतालिकेत दिवसागणिक उलथापालथ होत असते. सध्या पुणेरी पलटण संघ जबरदस्त कामगिरी करत असून 10 पैकी 9 सामन्यात विजय मिळवत अव्वल स्थान गाठलं आहे.

तर दबंग दिल्ली 11 पैकी 7 सामने जिंकत 40 गुणांसह दुसरं स्थान गाठलं आहे.प्रत्येक संघाला 22 सामने खेळायचे असून 11 होम आणि 11 अवे अशी मांडणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्लेऑफच्या शर्यतीत जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. सोमवारी 8 जानेवारीला बंगळुरु बुल्स आणि पटणा पायरेट्स, यु मुंबा आणि दबंग दिल्ली यांच्यात सामना झाला. या सामन्याच्या निकालामुळे बराच फरक पडला आहे. बंगळुरुने पाटण्याचा अवघ्या 2 पॉईंटने पराभव केला. तर दबंग दिल्लीने 6 पॉइंट्सने यु मुंबावर मात मिळवली आहे.

विशेष म्हणजे घरच्या मैदानावर दिल्ली दबंगने यु मुंबा तारे दाखवले. 40-34 च्या फरकाने दिल्लीने सामना जिंकला. या विजयासह दिल्लीने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. तर मुंबईचं गणित किचकट झालं आहे.आज तेलगु टायटन्स आणि बंगाल वॉरियर्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 8 वाजता होणार आहे. या सामन्याच्या निकालाचाही गुणतालिकेवर फरक दिसून येईल. तेलगु टायटन्स गुणतालिकेत एकदम तळाशी आहे. त्यामुळे प्लेऑफच्या शर्यतीत राहायचं असेल तर हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे.

 

तेलगु टायटन्स

सर्व्हिस टाकणारे : रजनीश, विनय, पवनकुमार सेहरावत, ओंकार नारायण पाटील, प्रफुल्ल सुदाम झावरे, रॉबिन चौधरी

बचावकर्ते : परवेश भैंसवाल, मोहित, नितीन, अंकित, गौरव दहिया, अजित पांडुरंग पवार, मोहित, मिलाद जब्बारी

अष्टपैलू : शंकर भीमराज गदई, संजीवी एस, ओंकार आर. मोरे, हमीद मिर्झाई नादर

बंगाल वॉरियर्स

सर्व्हिस टाकणारे : मनिंदर सिंग, श्रीकांत जाधव, सुयोग बबन गायकर, प्रशांत कुमार, अस्लम सजा मोहम्मद थंबी, अक्षय जयवंत बोडके, विश्वास एस, चाय-मिंग चांग, नितीन कुमार, आर गुहान, महारुद्र गर्जे

बचावकर्ते : शुभम शिंदे, वैभव भाऊसाहेब गर्जे. आदित्य एस. शिंदे, अक्षय कुमार, श्रेयस उंबरदंड, दिपक अर्जुन शिंदे

अष्टपैलू : नितीन रावल, भोईर अक्षय भारत

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -