13 जानेवारी 2024 : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सहाजिकच उद्धव ठाकरे आणि शिंदे यांच्यात दुरावा निर्माण झाला. मात्र या बंडानंतर शिंदे आणि ठाकरे पहिल्यांदाच एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.उद्धव ठाकरे आज श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण-डोंबिवली मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालघरच्या दौऱ्यावर जात आहेत.
शिंदे ठाण्याहून पालघरला जाताना या दोन नेत्यांचा ताफा समोरासमोर आला.थोड्यावेळा आधी उद्धव ठाकरे मातोश्रीवरून कल्याणच्या दिशेने रवाना झाले. उद्धव ठाकरे विक्रोळी या ठिकाणी पोहोचले असता एकनाथ शिंदेंचा ताफा मागून आलामुंबईतील विक्रोळी भागात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा ताफा समोरासमोर आला.
तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला वाट काढून देताना पोलिसांची मात्र दमछाक झाली.उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा समोरासमोर आल्याने आता काय घडणार, याकडे सगळ्याचं लक्ष होतं. मात्र उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांना ओव्हरटेक करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा भरधाव वेगाने पुढे निघाला.