आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राज्यात महायुतीचे मेळावे सुरू झाले आहे. जिल्हास्तरीय पातळीवर महायुती मधील तिन्ही पक्षाचे नेते एकाच व्यासपीठावर येत लोकसभा निवडणुकीचा प्रचार करतांना दिसत आहेत.आमच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. त्यावर आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
आज महायुतीत असलेल्यांचा करिश्मा आहे. काही दिवसात त्या गटात असलेले पाच आमदार आणि दोन महत्वाचे नेते उद्या दादांसोबत दिसतील. तेव्हा तुम्ही आश्चर्च करून घेण्याचं काही कारण नाही. असा दावा मिटकरींना केला आहे. तर अजितदादा मित्र मंडळाचे काही नेते भाजपच्या संपर्कात आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गटातील बहुतांश खासदारांचे मत देखील भाजपच्या चिन्हावर लढवण्याचं आहे. अशा पद्धतीने अनेक जण भाजपच्या वाटेवर असल्याचं मत रोहित पवारांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान, राज्यात महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. त्याआधी अनेक जण पक्ष प्रवेश करतांना दिसत आहेत. यातच कॉंग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. तर अनेक जण भाजप अन् राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे.