बऱ्याच दिवसांनंतर टेक शेअर्समध्ये दमदार वाढ झाल्याने तेजीचं वातावरण पुन्हा निर्माण झालं आहे. त्यामुळे 12 जानेवारीला संपलेल्या सप्ताहात बाजाराने नवा उच्चांक गाठला. मार्केट तज्ज्ञांच्या मते,निफ्टी 22,000 अंकांजवळ पोहोचला आहे.निफ्टीसाठी 21,700 ते 21,800 हा स्तर तात्काळ दृष्टिपथात आला आहे. पुढे निफ्टी आपल्याला 22,000ते 22,200 कडे वाटचाल करताना दिसेल.
गेल्या आठवड्यात निफ्टी 50 इंडेक्स 0.85 टक्क्यांनी वाढून 21.894.55 या नवीन क्लोजिंग पातळीवर बंद झाला. सलग सात आठवडे तो उच्च पातळीवर कायम राहिला. एन्जल वनचे ओशो कृष्ण यांच्या म्हणण्यानुसार,सध्या निफ्टी 22,000 या माईलस्टोनपासून फक्त एक पाऊल लांब आहे. मजबूत मार्केट सेटअप बघता 15 जानेवारीपासून सुरू झालेल्या सप्ताहात निफ्टी 22,100 ते 22,150 चं लक्ष्य गाठू शकतो. निफ्टी 21,750 ते 21,800 च्या स्तरावर पोहोचण्यासाठी स्थिती पोषक वाटते.
आनंद राठी कंपनीचे जिगर पटेल म्हणाले की,चालू आठवड्यात निफ्टी 22,000 वर दिसू शकतो.तो 22,200 ते 22,400 कडे झेपावताना दिसू शकतो.
मार्केट तज्ज्ञांचं तेजीवर एकमत आहे. पण सध्या स्थिती सामान्य ठेवण्याचा गरज असल्याचा सल्ला ते देतात. मनीकंट्रोल तुमच्यासाठी येत्या तीन ते चार आठवड्यातचांगला रिटर्न्स देऊ शकतील अशा दहा शेअर्सची यादी घेऊन आला आहे. शेअर परताव्याची ही आकडेमोड 12 जानेवारीच्या क्लोजिंग प्राइसच्या आधारे आहे.
गोदरेज प्रॉपर्टीजमध्ये 2185 रुपयांच्या स्टॉपलॉससह 2500 रुपयांच्या टार्गेटसाठी खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.आशिका ग्रुपचे ओंकार पाटील यांच्या मते, यातून येत्या काळात दहा टक्के रिटर्न मिळू शकतो.
ओंकार यांच्या मते, महानगर गॅसच्या स्टॉकमधून येत्या तीन ते चार आठवडयात नऊ टक्के रिटर्न मिळू शकतो. हा स्टॉक 1000 ते 1150 रुपयांच्या रेंजमध्ये होता तो पुढे या स्टॉकमध्ये 1375 रुपयांचं टार्गेट पाहायला मिळू शकतं.
– ग्रासिम इंडस्ट्रीज कंपनीचा स्टॉक येत्या काळात या नऊ टक्के रिटर्न देऊ शकतो, असंही ओंकार सांगतात.
– एचडीएफसी सिक्युरिटीजचे नंदीश शाह यांनी पॉवर मेक प्रोजेक्ट्सेमध्ये 5150 ते 5350 रुपयांच्या टार्गेटसह 4380 रुपयांच्या स्टॉपलॉसह खरेदीचा सल्ला
येत्या तीन ते चार आठवड्यात या स्टॉकमध्ये 13 टक्के रिटर्न मिळू शकतो.
सुप्रजीत इंजिनिअरिंगचा स्टॉक शाह यांनी 435 ते 455 रुपयांच्या टार्गेटसाठी 380 रुपयांच्या स्टॉपलॉससह खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तो12 टक्के रिटर्न देऊ शकतो तसंच शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला शाह यांनी दिला आहे. हा शेअर येत्या तीन ते चार आठवड्यात 15 टक्के रिटर्न देऊ शकतो.
पंजाब नॅशनल बँकेचा स्टॉक 105 च्या टार्गेटसाठी 94 रुपयांच्या स्टॉपलॉससह खरेदी करण्याचा सल्ला कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान यांनी दिला आहे. त्यांच्या मते येत्या तीन ते चार आठवड्यात यातून 7.4 टक्के रिटर्न मिळू शकतो.त्यांनी एल अँड टी फायनान्सचा स्टॉक 180 रुपयांच्या टार्गेटसह 160 रुपयांच्या स्टॉपलॉससह खरेदी करावा असं सांगितलंय.
चौहान यांनी हिंडाल्को इ्ंडस्ट्रीजचा स्टॉक 625 रुपयांच्या टार्गेटसाठी 560 रुपयांच्या स्टॉपलॉससह खरेदी केल्यास 7.4 टक्के नफा मिळू शकतो असं म्हटलंय.सॅमको सिक्युरिटीजचे डेरिव्हेटिव्ह विश्लेषकआश्विन रमाणी यांच्या मते इन्फोसिसचा स्टॉक 1613 रुपयांच्या सध्याच्या बाजार भावासह 1600 रुपयांचा स्तर कायम राखू शकतो. त्यांनी सध्या 1550 रुपयांच्या स्टॉपलॉस आणि 1750 रुपयांच्या टार्गेटसह हा स्टॉक घ्यावा.
आश्विन यांनी जस्ट डायलचा स्टॉक 840 रुपयांच्या स्टॉपलॉससह 1050 रुपयांच्या टार्गेटसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते,येत्या तीन ते चार आठवड्यात या स्टॉकमधून 20 टक्के रिटर्न मिळू शकतो.




