अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी १६ जानेवारीपासून विधी सुरु झाला आहे. २२ जानेवारी रोजी राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या प्राणप्रतिष्ठेपूर्वी मंदिरात गुरुवारी रामलल्लाची मूर्ती आणण्यात आली. चार तास ही पूजाविधी चालली. या रामलल्लाच्या मूर्तीची पहिली झलक प्रथमच समोर आली.
गर्भगृहात आसनावर ही मूर्ती ठेवण्यात आली आहे. हा फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फोटोत बालकरुपातील रामलल्ला दिसत आहेत. कर्नाटकातील प्रसिद्ध मूर्तीकार अरुण योगीराज यांनी ही मूर्ती बनवली आहे.
मूर्ती आता झाकून ठेवलेली आहे.गर्भगृहातील पहिला फोटोगुरुवार रामलल्ला गर्भगृहात विराजमान झाले. यावेळी विविध प्रकारचे संस्कार आणि पूजन करण्यात आले. प्राणप्रतिष्ठेसाठी काशीवरुन आलेल्या पुरोहितांच्या टीमने विधी विधान केले.
हा कार्यक्रम संपल्यानंतर गुरुवारी रात्री रामलल्लाची गर्भगृहातील पहिला फोटो समोर आला. फोटोमध्ये राम मंदिर कार्यात काम करणारे कामगार हाथ जोडून भगवान श्रीराम यांना नमस्कार करताना दिसत आहे.
कृष्णशिळेतून घडवलेली ही मूर्ती अरुण योगीराज यांनी तयार केली आहे. राम मंदिरासाठी एकाच वेळी तीन मूर्तीकार मूर्ती घडवण्याचे काम करत होते. त्यातील योगीराज यांची मूर्ती गर्भगृहात ठेवण्याचा निर्णय झाला. अरुण योगीराज यांचे वडील प्रसिद्ध मूर्तीकार होते. अरुण योगीराज यांच्या कलेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतूक केले आहे. मूर्ती तयार करण्याचे काम सुरु असताना योगीराज यांनी मोबाइल हातात घेतला नाही. कुटुंबाशी त्या कालावधीत त्यांचे बोलणे होत नव्हते.3.4 फूट उंच रामलल्लाचे आसन
रामलल्लाचे आसन 3.4 फूट उंच आहे. क्रेनच्या मदतीने रामलल्लाची मूर्ती राम मंदिर परिसरात आणली गेली. त्याचे काही फोटो समोर आले होते. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी त्याचे आसनही तयार केले गेले. रामलल्लाची मूर्ती आसनावर प्रतिष्ठापणा करण्यापूर्वी चार तासांपेक्षा जास्त वेळ लागला. मंत्रोच्चार विधी आणि पूजन विधी करुन भगवान राम यांना आसनावर विराजमान करण्यात आले. आता 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होणार आहे.