गेल्या तीन दिवसांतील प्रचंड घसरणीनंतर आज शेअर बाजारात (Stock Market) जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. खरेदीचा मंदावलेला वेग आणि ग्लोबल मार्केटमधील रिकव्हरी यामुळे शेअर बाजाराला काहीसा आधार मिळाला आहे. BSE सेन्सेक्स आणि निफ्टी उघडताच रॉकेट वेगानं सुसाट वधारताना दिसले. सेन्सेक्स आणि निफ्टीनं 0.80 टक्क्यांपर्यंत वाढीसह व्यवहारात चांगली सुरुवात केली. काल (गुरुवारी) सेन्सेक्स 71,186.86 वर बंद झाला. त्या तुलनेत शुक्रवारी सेन्सेक्स 600 अंकांनी वाढून 71,786.74 वर उघडला. BSE लिस्टेड टॉप 30 शेअर्समध्ये केवळ इंडसंड्स बँकेचे शेअर्स घसरल्याचं पाहायला मिळालं. तर इतर शेअर्समध्ये तेजी दिसून आली.