युपीआय पेमेंट जेव्हा सुरु झालेले तेव्हा गुगल पे, पेटीएम, फोन पेवर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी घसघशीत कॅशबॅक दिला जात होता. हा कॅशबॅक कधी दोन रुपये, कधी चार रुपयांवर आला कळलेच नाही. नंतर तर बेटर लक नेक्स टाईमचाच मेसेज दिसायचा…गेली चार-पाच वर्षे ग्राहक तर विसरूनच गेले होते. कंपन्या रमी सर्कल सारख्या अॅपचा कॅशबॅक देत होते. परंतु, सध्या एक अॅप असे आहे जे गेल्या चार-पाच दिवसांपासून जवळपास प्रत्येक मर्चंट ट्रान्झेक्शनला ३० रुपयांचा घसघशीत कॅशबॅक देत आहे.
चायनिजचा गाडा असेल की किराणा दुकान, १०० रुपये किंवा त्यापेक्षा जास्तीचे ट्रान्झेक्शन असेल तर तुम्हाला ३० रुपयांचा कॅशबॅक तुमच्या अकाऊंटमध्ये थेट वळता केला जाणार आहे.दुकानांमधील पेमेंटसाठीचा क्यूआर कोड स्कॅन केल्यावर हा कॅशबॅक मिळत आहे. अनेकांनी या कॅशबॅकचा लाभ घेतला आहे.