Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगआयसीसीकडून टीमची घोषणा, सूर्यकुमार यादव कॅप्टन

आयसीसीकडून टीमची घोषणा, सूर्यकुमार यादव कॅप्टन

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 जून महिन्यात पार पडणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत 1 ते 29 जून दरम्यान टी 20 वर्ल्ड कप पार पडणार आहे. त्याआधी आयसीसीने मोठी घोषणा केली आहे.

आयसीसीने 2023 मेन्स टी 20 टीमची घोषणा केली आहे. मुंबईकर सूर्यकुमार यादव याच्याकडे या टीमची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अर्थात सूर्या या टीमचा कॅप्टन आहे. सूर्याने 2023 या वर्षात हार्दिक पंड्या या नियमित कर्णधाराच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची कॅप्टन्सी केली होती. आयसीसीने जाहीर केलेल्या या टीममध्ये सूर्यासह एकूण 4 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. या 4 खेळाडूंमध्ये 2 फलंदाज आणि 2 गोलंदाजांचा समावेश आहे. तर पाकिस्तानच्या एकाही खेळाडूला स्थान मिळालेलं नाही.

 

सूर्यकुमार यादव याच्यासह टीम इंडियाच्या यशस्वी जयस्वाल, रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंह या तिघांचा समावेश आहे. यशस्वी जयस्वाल याने एशियन गेम्समध्ये नेपाळ विरुद्ध खणखणीत शतक ठोकलं होतं. यशस्वीने फ्लोरीडामध्ये 84 धावांची खेळी केली. तसचे रवी बिश्नोई याने 2023 वर्षात 18 टी 20 विकेट्स घेतल्या. बिश्नोई याच जोरावर बॉलर रँकिंगमध्ये चौथ्या स्थानी पोहचला. तर अर्शदीप यानेही 21 टी 20 सामन्यात 26 विकेट्स घेतल्या.

 

आयसीसीने 2023 मधील सर्वोत्तम टी 20 टीममध्ये युगांडाच्या अल्पेश रमजानी याचा समावेश केला आहे. अल्पेश याने 2023 मध्ये 55 विकेट्ससह 30 सामन्यात 449 धावा केल्या. तर ऑलराउंडर म्हणून झिंबाब्वेच्या सिंकदर रझा याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच झिंबाब्वेच्या रिचर्ड नगारवा हा देखील या टीममध्ये आहे.

 

आयसीसी बेस्ट मेन्स टीम ऑफ द ईअर 2023आयसीसी मेन्स टी 20 टीम 2023 | सूर्यकुमार यादव (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, फिल साल्ट, निकोलस पूरन, मार्क चॅपमॅन, सिकंदर रझा, अल्पेश रमजानी, मार्क अडायर, रवी बिश्नोई, रिचर्ड नगारवा आणि अर्शदीप सिंह.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -