प्रवर्तन निर्देशालय म्हणजे ED कडून आज एक मोठ पाऊल उचलल जाऊ शकतं. ईडीकडून थेट एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर अटकेची कारवाई होऊ शकते. ईडीसोबत पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे. ईडीने आधी या नेत्याला हजर होण्यासाठी समन बजावलं होतं.सध्या ईडीकडून देशात विविध राजकीय नेत्यांची चौकशी सुरु आहे. आर्थिक अनियमितता, घोटाळ्यांच्या प्रकरणात अनेक नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. केंद्रातील सरकार आपल्या राजकीय फायद्यासाठी ईडीचा वापर करते, असा आरोप विरोधी पक्षांकडून भाजपावर करण्यात येतो.
आतापर्यंत विरोधी पक्षातील अनेक नेत्यांभोवती ईडीने आपला फास आवळला आहे. आता या मध्ये आणखी एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भर पडू शकतो. महत्त्वाच म्हणजे ईडीकडून यावेळी थेट अटकेची कारवाई होऊ शकते. ईडी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना थेट अटक करु शकते.जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये चौकशी करण्यासाठी प्रवर्तन निर्देशालय (ED) ची एक टीम राजधानी दिल्लीत दाखल झाली आहे. ही टीम हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी दाखल झाली आहे. हेमंत सोरेन हे झारखंडचे मुख्यमंत्री आहेत. हेमंत सोरेन हे दक्षिणी दिल्लीतील शांती निकेतन या निवासस्थानी राहतात. त्यांच घर दक्षिणी दिल्लीतील पॉश भागात आहे.
‘आम्ही स्वत: येऊ’, अस ईडीने सांगितलेलंसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी त्यांना अटक सुद्धा होऊ शकते. ईडीला जमीन घोटाळा प्रकरणात हेमंत सोरेन यांची चौकशी करायची आहे. त्यांच्या निवासस्थानाच्या आत आणि बाहेरं मोठ्या प्रमाणात सुरक्षारक्षक तैनात आहेत. प्रवर्तन निर्देशालय ईडीने कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी-लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना समन दिलं होतं. त्यांना 29 आणि 31 जानेवारीला हजर व्हायला सांगितलं होतं. हजर झाला नाहीत, तर आम्ही स्वत: येऊ, अस ईडीकडून सांगण्यात आलं होतं.
कितव समन होतं?हेमंत सोरेन यांची आधी सुद्धा ईडीने चौकशी केली आहे. ईडीने रांचीमध्ये आठ तास त्यांची चौकशी केली होती. हेमंत सोरेन यांना काही दिवसांपूर्वी 10 व समन पाठवण्यात आलं. हजर नाही झालात, तर आम्ही चौकशीसाठी येऊ असं ईडीने आधीच सांगितलं होतं. प्रवर्तन निर्देशालयाकडून समन जारी झाल्यानंतर हेमंत सोरेन अचानक दिल्लीला रवाना झाले.