Monday, August 25, 2025
Homeमहाराष्ट्रतिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे सहायक पोलिस आयुक्त अशोक धुमाळ यांचे निधन

तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे सहायक पोलिस आयुक्त अशोक धुमाळ यांचे निधन

पुणे शहर पोलिस दलातील सहायक पोलिस आयुक्त अशोक धुमाळ यांचे सोमवारी (ता. २९) रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. अशोक धुमाळ कात्रज परिसरात वास्तव्यास होते.१५ जानेवारी रोजी पाय घसरून तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे ते जखमी झाले होते.

त्यांच्या पायाला आणि बरगड्यांना फ्रॅक्चर झाले होते. त्यांच्यावर भारती विद्यापीठ रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर साध्या वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. परंतु प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना तीन दिवसांपूर्वी रूबी हॉल क्लिनिकमध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते.

श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास धुमाळ यांनी अखेरचा श्वास घेतला. धुमाळ यांच्या पार्थिवावर मंगळवारी (ता. ३०) सकाळी सातारा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

अशोक धुमाळ हे मूळचे सातारा जिल्ह्यातील रहिवासी होते. पुणे ग्रामीण पोलिस दलातील पौड पोलिस ठाण्यात त्यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदावर काम केले होते. पदोन्नतीनंतर त्यांच्याकडे पुणे शहर पोलिस दलातफरासखाना विभागाच्या सहायक पोलिस आयुक्ताचा पदभार सोपविण्यात आला होता. शांत, संयमी आणि सुस्वभावाचे अधिकारी म्हणून ते परिचित होते. त्यांच्या निधनाने शहर पोलिस दलात शोककळा पसरली आहे.

ही अत्यंत दु:खद घटना आहे. शहर पोलिस दलातील एका चांगल्या अधिकाऱ्याच्या निधनाने दु:ख झाले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -