मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सोशल मीडियात(socail media agency) मराठा आरक्षणविरोधी पोस्ट लिहिणाऱ्यांना कडक शब्दात इशारा दिला आहे. हे लोक कोणत्या पक्षाचे आहेत, कोणत्या नेत्याचे आहेत.. हे आपल्याला माहिती असल्याचंही त्यांनी सांगितलं.
जालन्यातल्या आंतरवाली सराटी इथं सोमवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ते म्हणाले की, काही राजकीय पक्षाचे लोक सोशल मीडियामध्ये(socail media agency) मराठा आरक्षणाबाबत चुकीच्या पोस्ट करत आहेत. ते लोक कोणत्या पक्षाचे आहेत आणि कोणत्या नेत्याचे आहेत, हे मी जाहीर करणार आहे. पुढच्या दोन-चार दिवस त्यांना संधी देतो. ते थांबले नाहीत तर नावं जाहीर करणार असल्याचा इशारा जरांगेंनी दिला आहे.
यावेळी बोलताना त्यांनी सरकारच्या अधिसूचनेवरुन टीका करणाऱ्यांवरही निशाणा साधला. काही जण सरकारची सुपारी घेऊन सोशल मीडियावर ट्रॅप करत आहेत. त्यांना पद पैसे हवे आहेत. ७० ते ७५ वर्षात जे झालं नाही ते आज झाल्याने काही नेते आणि समाजात काम करणारे नेते जळत आहेत. त्यांना असं वाटत आहे त्यांची दुकाने बंद झाली. त्यांच्या ट्रॅपला मी घाबरत नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.
सगेसोयऱ्यांच्या बाबतीत सरकारने १५ तारखेला अधिवेशन बोलावलं आहे. त्यानुसार मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळणार आहे. या कायद्याची अमलबजावणी व्हावी, यासाठी १० तारखेपासून मी पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहे. यापूर्वी मी समाजासाठी मरायला तयार होतो, आता मराठा समाजातील जे लोक विरोधात लिहित आहेत त्यांच्यासाठी मरायला तयार आहे. त्यांनी १० तारखेनंतर अंतरवाली सराटीमध्ये येवून बसावं, अभ्यासकांनीही १० तारखेला इथं यावं, असं आवाहन जरांगे पाटलांनी केलं.”
मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. येत्या १० फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहेत. १० तारखेलाच मराठा समाजाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठा आरक्षणाचा कायदा पारित करावा आणि आरक्षण लागू व्हावं म्हणून आमरण उपोषण करणार आहे, असं मनोज जरांगे यांनी जाहीर केलं आहे.