Sunday, December 22, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजी : प्रेमी युगूलाची आत्महत्या : तारदाळ येथे टाकवडेमधील प्रेमी युगलाची रेल्वेखाली...

इचलकरंजी : प्रेमी युगूलाची आत्महत्या : तारदाळ येथे टाकवडेमधील प्रेमी युगलाची रेल्वेखाली आत्महत्या

ताजी बातमी/ऑनलाइन टीम

इचलकरंजी पासून जवळच असलेल्या टाकवडे येथील प्रेमी युगूलाने तारदाळ येथे रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना आज शनिवारी घडली. टाकवडे मधील किरण कांबळे व रणजीत कांबळे या प्रेमी युगलाने धावत्या रेल्वे खाली आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली तारदाळ येथील औद्योगिक वसाहतीनजीक घडली.

सरकार देणार 50 हजारपर्यंत बिनव्याजी कर्ज! आत्ताच करा अर्ज (Government Loan)

याबाबत सविस्तर माहिती अशी की , तारदाळ येथील हातकणंगले जयसिंगपूर या रेल्वे मार्गावर शनिवारी सायंकाळ च्या सुमारास रणजीत राजेंद्र कांबळे (वय २२वर्ष) व किरण अमोल कांबळे (वय १७ वर्ष) यांनी धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली.

वस्तू खरेदी करुनही मनस्ताप! ॲमेझॉनसह फ्लिपकार्टने रिप्लेसमेंट पॉलिसी बदलवली

महाशिवरात्रीनंतर ६ दिवसांनी ‘या’ राशींच्या मंडळींना होणार बक्कळ धनलाभ? ‘बुधादित्य योग’ बनल्याने दारी येईल लक्ष्मी!

रेल्वेरुळावर मृतदेह आढळला असल्याची बातमी वाऱ्यासारखी तारदाळ परिसरात पसरली.त्यामुळे तरूण व तरुणीच्या नातेवाईकांनी व मित्रपरिवाराने घटनास्थळी गर्दी केली होती.

दरमहा ३ हजार मिळवा ! मुख्यमंत्री वयोश्री योजना ऑनलाईन अर्ज या तारखेला होणार सुरु (Mukhyamantri Vayoshri Yojana)

घटनेची माहिती पोलीस पाटील संतोष लोहार यांनी शहापूर पोलिसांना दिल्यानंतर शहापूर पोलीसानी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून दोघांचा मृतदेह शव विच्छेदनासाठी हातकणंगले ग्रामीण रुग्णालय येथे पाठवला आहे. आत्महत्याचे कारण समजले नसून अधिक तपास शहापुर पोलीस करत आहेत.

दरम्यान या घटनेमुळे इचलकरंजी टाकवडे तारदाळ परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -