प्रत्येकालाच शॉपिंग करायला आवडत. पण पैसे कमी असल्याने तुम्ही वस्तू खरेदी करणे टाळता का? जर तुमचे उत्तर हो असेल, तर मित्रांनो, असे करू नका. कारण आता तुम्ही अँड्रॉइड मोबाईल, स्मार्ट एलईडी टीव्ही, लॅपटॉप, एसी, कॉम्प्युटर इत्यादी सर्व वस्तू बजाज ईएमआय कार्ड द्वारे हप्त्यांवर खरेदी करू शकता. मित्रांनो, पूर्वीच्या काळी आपण वस्तू खरेदी करताना रोख पैसे द्यायचो. पण आता परिस्थिती बदलली आहे. अनेक जण पैश्यांची अडचण आहे म्हणून किंवा इतर काही कारणांमुळे हप्त्याने एखादी वस्तू खरेदी करतात. आणि नंतर ईएमआई च्या रुपात हळूहळू पैसे भरतात. जेणेकरून स्वतः वर आर्थिक अडचण येऊ नये. personal loan
पैसा गुणाकारात वाढतोय, लिस्ट सेव्ह करा : लोकांची पसंती या SBI म्युच्युअल फंड योजनांना
यासाठी तुम्ही बजाज ईएमआई कार्ड चा वापर करू शकता. हो मित्रांनो, बजाज ईएमआय कार्ड हे एक क्रेडिट कार्ड सारखेच आहे. जे तुम्हाला तुमच्या क्रेडिट स्कोर नुसार व्यवहाराची मर्यादा देते. म्हणजे तुम्ही ईएमआई वर 50 ते 60 हजार रुपये पर्यंत ऑनलाईन शॉपिंग करू शकता आणि दर महिन्याला हप्त्यांमध्ये ईएमआई भरू शकता. मुख्य म्हणजे यात तुम्हाला कोणत्याही प्रकारचे व्याज द्यावे लागत नाही. याच बजाज ईएमआय कार्ड बद्दल अजून काही माहिती आपण पुढे बघणारच आहोत.सर्वात पहिले बजाज फिनसर्व्ह ईएमआय कार्ड म्हणजे काय आहे ते जाणून घेऊ या….
बजाज फिनसर्व्ह EMI कार्ड म्हणजे काय ?
मित्रांनो, बजाज फिनसर्व्ह ईएमआय कार्ड हे खरेदी करण्यासाठी वापरले जाणारे एक डिजिटल कार्ड आहे. जे तुम्हाला सर्वात मोठी खरेदी करण्यास मदत करते. अगदी कोणतेही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, टेलिव्हिजनपासून ते फर्निचरपर्यंत, तसेच जीवनावश्यक उत्पादने आणि तुमच्या आवडीच्या सर्व मोठ्या वस्तू खरेदीसाठी, बजाज फिनसर्व्ह ईएमआय कार्ड तुम्हाला उपयोगी पडणारे कार्ड आहे. या कार्ड द्वारे तुम्ही बजाज च्या पार्टनर स्टोअर मधून तुमच्या गरजेनुसार तुम्ही खरेदी करू शकता. आणि यात 3 ते 24 महिन्यांच्या कालावधीत ईएमआई भरू शकता.personal loan
Airtel Plan: एक वर्षांपर्यंत रिचार्ज करावा लागणार नाही, सगळ्यात स्वस्त प्लान
बजाज फिनसर्व्ह ईएमआय कार्डसाठी किती चार्जेस द्यावे लागतात?
मित्रांनो, बजाज फिनसर्व्ह ईएमआय कार्ड साठी तुम्हाला एकूण 599 रुपये GST सह द्यावे लागतात. आधी याची फी 530 रुपये इतकी होती. पण आता ती वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आता तुम्हाला जीएसटी सह एकूण 599 रुपये द्यावे लागणार आहेत. यात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याची अन्युअल फी म्हणजे वार्षिक फी सुद्धा असते. जर तुम्ही हे कार्ड एका वर्षात एकदा पण युझ केले नाही तर तुम्हाला 190 रुपये भरावे लागतात. आणि जर तुम्ही हे कार्ड एका वर्षात वापरले तर तुम्हाला वार्षिक फी द्यावी लागणार नाही.
बजाज फिनसर्व्ह ईएमआई कार्ड पात्रता काय आहे व कोण कोणते कागदपत्रे लागतात?
मित्रांनो, बजाज फिनसर्व्ह ईएमआय कार्डसाठी तुमचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त आणि 65 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तसेच या कार्डसाठी तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड, आणि तुमचे बँक अकाउंट डिटेल्स जे मोबाईल नंबर शी लिंक केलेले असेल.
विमा पॉलिसी नाही आवडली तर करा की परत! 30 दिवसांची मिळणार ट्रायल : Insurance
बजाज फिनसर्व्ह EMI कार्डसाठी अप्लाय कसे करायचे
मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला www.bajajfinserv.in या वेबसाईटवर जायचे आहे. Shop on EMI मध्ये EMI Card वर क्लिक करायचे आहे.
बजाज फिनसर्व्ह EMI कार्डसाठी अप्लाय करण्यासाठी डायरेक्ट लिंक => bajajfinserv.in/insta-emi-card
त्या नंतर होम पेज वर थोडे खाली तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल. तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे व थोड्याच वेळात तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल. तो दिलेल्या जागी टाकून नंबर व्हेरिफाय करून घ्यायचा आहे.
आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला पॅन कार्ड नुसार तुमचे पूर्ण नाव, जन्म तारीख, पॅन कार्ड नंबर आणि तुमचा रेसिडेंशिअल पिन कोड टाकायचा आहे.
मित्रांनो, तुमचे डिटेल्स व्हेरिफाय करून तुम्ही कार्डसाठी एलिजीबल म्हणजेच पात्र आहात का ते तपासले जाते. आणि जर एलिजीबल असाल तर तुम्हाला कार्ड वर किती लिमिट पर्यंत कार्ड देण्यात येईल ते सांगितले जाते. व नंतर खाली दिलेल्या Proceed बटन वर क्लिक करायचे आहे.
आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला Digilocker वरून KYC करण्यास सांगितले जाईल. तर त्यासाठी इथे क्लिक करायचे आहे.
व नंतर तुम्ही Digilocker मध्ये तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला आहे त्या वरून तुम्हाला लॉगिन करायचे आहे. तुम्ही जर आधार कार्ड वरून लॉगिन केले असेल तर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे व सहा अंकी पिन टाकायचा आहे. व सबमिट करायचे आहे. तुमच्या आधार कार्ड ला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक ओटीपी येईल तो टाकायचा आहे व नंतर Next ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.personal loan