देवांचे गुरुवर्य मानला जाणारा गुरु ग्रह ठराविक काळानंतर राशी बदलतात. बृहस्पति सध्या स्वतःच्या मेष राशीत स्थित आहे.१ मे मे रोजी दुपारी १: ५० वाजता वृषभ राशीत प्रवेश करेल. वृषभ राशीमध्ये गुरुचे गोचर प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे नक्कीच परिणाम करेल. दुसरीकडे, छाया ग्रह केतू कन्या राशीत आहे.
अशा स्थितीत सिंह राशीच्या नवव्या घरामध्ये दोघांची युती निर्माण होईल, त्यामुळे नवपंचम योग तयार होत आहे. नवपंचम राजयोग हा सर्वात शुभ योगांपैकी एक मानला जातो. हा योग तयार झाल्याने प्रत्येक कामात यश मिळेल. त्याबरोबर उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील आणि कुटुंबाबरोबर वेळ घालवला जाईल. चला जाणून घेऊया नवपंचम योग तयार झाल्यामुळे कोणत्या राशींना प्रचंड फायदा होईल.
सिंह राशीदेवगुरुचे संक्रमण दशम भावात होईल, त्यामुळे केतूसोबत ‘नवपंचम योग’ तयार होत आहे. अशा स्थितीत सिंह राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. याचबरोबर तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवाल. अनेक दिवसांपासून कुटुंबात सुरू असलेली तेढ आता दूर येऊ शकते. कायदेशीर बाबींमध्ये यश मिळू शकते. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्हाला पालकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. नवीन वाहन, मालमत्ता खरेदी करू शकता. तुमच्या भाषण कौशल्याने तुम्ही इतरांसाठी मार्गदर्शक व्हाल. आरोग्याबाबत थोडे सावध राहा. तुम्हाला अनेक प्रकारचे प्रवास करावे लागतील. परंतु यामध्ये तुम्ही यश मिळवू शकता.
कन्या राशीनवपंचम योग तयार झाल्यामुळे या राशीच्या लोकांना आर्थिक, मानसिक आणि शारीरिक समस्यांपासून आराम मिळू शकतो. यामुळे दीर्घकाळ चाललेल्या समस्या संपुष्टात येऊ शकतात. अपूर्ण कामे पूर्ण होऊ शकतात. , कुटुंबासह चांगला वेळ घालवाल. त्याचबरोबर आर्थिक फायदा होऊ शकतो.तसेच तुम्हाला शिक्षण आणि मुलांकडून फायदे मिळू शकतात. अध्यात्माकडे तुमची ओढ वाढेल.
उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासात रस राहील. एकाग्रता आणि बुद्धिमत्ता तीक्ष्ण असेल. मुलाकडून काही चांगली बातमी मिळू शकते. तुमचे तुमच्या मुलांबरोबरचे दीर्घकाळचे मतभेद आता दूर होतील. लव्ह लाईफमध्येही तुम्हाला बरेच फायदे मिळतील. शेअर मार्केट, लॉटरी तुम्हाला नफा मिळू शकतो.
मिथुन राशीमिथुन राशीच्या लोकांनाही खूप फायदा होणार आहे. राजकारणाशी संबंधित लोकांना खूप फायदा होणार आहे. तुम्ही आता एफडी, शेअर मार्केट किंवा इतर माध्यमांमध्ये केलेल्या गुंतवणुकीचे फायदे मिळवू शकता. याचसह जीवनात अपार यशाबरोबर आर्थिक लाभही मिळू शकतो.
तुम्ही तुमच्या भाषणाने सर्वांना प्रेरित करू शकता. अपार संपत्ती मिळते. यासोबत गुप्त धन मिळू शकते. उधारीत पैसे मिळू शकतात. वडिलोपार्जित मालमत्ता, लॉटरी, स्थावर मालमत्ता इत्यादींमधून तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. यासोबतच आरोग्यही चांगले राहणार आहे. नोकरीतही भरपूर लाभ मिळण्याची शक्यता आहे.