भारत आणि इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे. यात काही खेळाडूंनी संधीच सोन केलं, तर काही खेळाडू झगडतायत. अशावेळी कॅप्टन म्हणून रोहित शर्माचा निर्णय महत्त्वाचा असणार आहे.
जगातील महान कर्णधारांमध्ये महेंद्र सिंह धोनीचा समावेश होतो. आपल्या खेळाडूंकडून बेस्ट कसं काढून घ्यायच? हे धोनीला समजत. युवा खेळाडूंना तो भरपूर संधी देतो. एक-दोन संधी दिल्यानंतर तो प्लेयरला बाहेरचा रस्ता दाखवत नाही. टीम इंडियाचा विद्यमान कर्णधार रोहित शर्माची कॅप्टनशिपची शैली धोनी सारखीच असल्याच मानल जातं. टीम इंडियाचा कर्णधार झाल्यानंतर रोहित अनेकदा म्हणालाय की, युवा खेळाडूंना त्याला पूर्ण संधी द्यायची आहे. सात मार्चपासून धर्मशाळामध्ये पाचवा कसोटी सामना सुरु होणार आहे.
त्यावेळी रोहित शर्माकडून हीच अपेक्षा असेल. एका प्रतिभवान खेळाडूला रोहित पुन्हा संधी देईल, अशी अपेक्षा आहे.आम्ही बोलतोय इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरीजमध्ये डेब्यु करणारा मधल्या फळीतील फलंदाज रजत पाटीदार विषयी. रजतने विशाखापट्टनम टेस्टमधून डेब्यु केला होता. त्यानंतर तो राजकोट आणि रांचीमध्ये सुद्धा खेळला. पण त्याच्या बॅटमधून धावा निघाल्या नाहीत. रजतच इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत फार चांगल प्रदर्शन नाहीय. आकडे उत्साहवर्धक नाहीयत.
विशाखापट्टनममध्ये पहिल्या डावात त्याने 39 धावा केल्या. दुसऱ्याडावात 9 धावा. राजकोटमध्ये पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्याडावात खात उघडू शकला नाही. रांचीमध्ये सुद्धा असच झालं. पहिल्या डावात 17 आणि दुसऱ्या डावात खातही उघडू शकला नाही. तीन कसोटी सामन्याच्या सहा डावात त्याने 63 धावा केल्या. या प्रदर्शनानंतर असं वाटतय की, रोहित कदाचित धर्मशाळा टेस्टमध्ये रजतला संधी देणार नाही. रजतने आपल्या आकड्यांनी प्रभावी कामगिरी केलेली नाही. शक्यता अशी आहे की, कदाचित रोहित पाचव्या कसोटीत रजतला संधी देणार नाही. पण हे योग्य ठरेल का?
कदाचित तो भविष्यात त्याच्या प्रतिभेला न्याय देऊ शकणार नाहीआंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबाव वेगळा असतो. काहीवेळा चांगले-चांगले खेळाडू सेट होण्यासाठी वेळ घेतात. तीन सामन्यात रजतच प्रदर्शन समाधानकारक नसेल, पण त्याच्यामध्ये प्रतिभा आहे. त्याला अजून संधी मिळाली आहे. तीन कसोटीतील कामगिरीच्या आधारावर रजतला बाहेर बसवल्यास त्याच्या आत्मविश्वासावर परिणाम होऊ शकतो. कदाचित यामुळे तो भविष्यात त्याच्या प्रतिभेला न्याय देऊ शकणार नाही.
रोहित स्वत: या टप्प्यांमधून गेला
अशावेळी रोहितने रजतला आणखी एक संधी दिल्यास त्याचा आत्मविश्वास वाढेल. रोहित स्वत: या टप्प्यांमधून गेला आहे. धोनीने रोहितला भरपूस संधी दिल्या. त्यामुळे अशावेळी खेळाडूच्या डोक्यात काय विचार असतो, हे रोहितला चांगलं माहितीय. त्यामुळे पाचव्या कसोटीसाठी रोहित रजतचा विचार करेल, अशी अपेक्षा आहे.