एकिकडे शेअर बाजारात तेजी पहायला मिळत आहे, तर दुसरीकडे सोने(gold rate) नवीन उंची गाठत आहे. अशी घटना क्वचितच पहायला मिळत आहे. मंगळवारीही सोन्याचे भाव ६४,००० रुपयांवर पोहोचले आहेत. सोन्याचा ही भाववाढ पुढेही कायम राहण्याची शक्यता आहे. आणि ही वाढ अशीच कायम राहिली तर सोन्याचे दर ७० हजार रुपयांपर्यंत वाढू शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
देशातील स्थिर सरकार आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्ह, ही दोन कारणं सोन्याच्या(gold rate) या भाववाढीमागे असल्याचं तज्ज्ञाचं म्हणण आहे. १ मे ला अमेरिकन बँक व्याजदरात मोठी कपात करू शकते, तसे संकेत देण्यात आले आहेत. येणाऱ्या काळात महागाईचे आकडे गगनाला भीडलेले पाहायला मिळतील. त्याचा परिणाम सोन्याच्या भाववाढीवरही होणार आहे. तर मे मध्ये अक्षय तृतीया देखील असणार आहे, त्यामुळे सोन्याला मोठी मागणी असेल.
पुढच्या तीन महिन्यात सोन्याच्या किमती ८ टक्के म्हणजे ५४०० रुपयांपर्यंत वाढू शकतात. सध्या ही वाढ १.६ टक्के आहे. सध्या १० ग्रॅम सोन्याची किंमत ६४५०० आहेत. मात्र मागच्या दोन महिन्यात तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजाप्रमाणे वाढ पहायला मिळालेली नाही. मात्र सोन्याच्या किमती वाढल्याच तर त्यासाठी अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेचे व्याजदर जबाबदार असू शकतात. फेड चेअरमन जेरोम पॉवेल यांनी आपल्या भाषणात तसे संकेत दिले आहेत.
१ मे पासून व्याजदर कपात केली जाईल, असा कयास लावला जात आहे. त्यामुळेच सध्या उचानक सोन्याच्या किमतींमध्ये वाढ होताना दिसत आहे. येणारे दोन ते तीन महिने याचा प्रभाव राहू शकतो. त्यामुळे येत्या दोनच आठवड्यात सोन्याचे भाव ६५,५०० रुपयांपर्यंत पोहोचू शकतात.
येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुका होतील. त्यानंतर स्थिर सरकार सत्तेत येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये आर्थिक डेटा सुधारण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष 2024 च्या चौथ्या तिमाहीचा आणि संपूर्ण आर्थिक वर्षाचा डेटा एप्रिल आणि मे महिन्यातच जारी केला जाईल. याशिवाय महागाईचे आकडेही सुधारण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम येत्या काही दिवसांत दिसून येईल