Credit Card Issuance Rules क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या कंपन्यांसाठी एक मोठी बातमी आहे. केंद्रीय बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत.
या अधिसूचनेनुसार, बँकेने क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिसूचनेनुसार, आता क्रेडिट कार्ड कंपन्यांना ग्राहकांसाठी अनेक पर्याय उपलब्ध करून द्यावे लागतील.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बँकांना ग्राहकांना एकापेक्षा जास्त कार्ड नेटवर्क निवडण्याचा पर्याय देण्याचे निर्देश दिले आहेत. ग्राहकांना क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या बँका आणि बिगर बँकांना एकाधिक कार्ड नेटवर्कमधून निवडण्याचा पर्याय द्यावा लागेल.कार्ड जारी करताना हा पर्याय दिला जाईल. RBI ने असे निर्देश दिले आहेत की त्यांनी कार्ड नेटवर्कशी असा कोणताही करार करू नये ज्यामुळे त्यांना इतरांच्या सेवांचा लाभ घेता येणार नाही. यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अधिकृत कार्ड नेटवर्कची नावे जाहीर केली आहेत.
RBI’s new guidelines to banks
यामध्ये American Express Banking Corp, Diners Club International Ltd, MasterCard Asia/Pacific Pte, National Payments Corporation of India-Rupay आणि Visa Worldwide Pte यांचा समावेश आहे. आरबीआयच्या मते, काही कार्ड नेटवर्क ग्राहकांच्या पर्यायांवर मर्यादा घालत आहेत त्यामुळे हे नवे निर्देश देण्यात आले आहेत.
नवीन सूचनांचा उद्देश काय आहे?
नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यामागील आरबीआयचा उद्देश जास्त क्रेडिट कार्ड जारी करणे आणि ग्राहकांना अधिक पर्याय देणे हा आहे. पात्र ग्राहकांना कार्ड जारी केल्यावर एकाधिक कार्ड नेटवर्कमधून निवडण्याचा पर्याय ऑफर करणे आवश्यक आहे.विद्यमान कार्डधारकांच्या बाबतीत, हा पर्याय त्यांच्या पुढील कार्डच्या वेळी दिला जाईल. या सूचना 10 लाखांपेक्षा कमी सक्रिय कार्ड असलेल्या क्रेडिट कार्ड कंपन्यांना लागू होणार नाहीत.