मित्रांनो, महाराष्ट्र शासनातर्फे तसेच भारत सरकार तर्फे अनेक वेगवेगळ्या सुविधा आपल्याला उपलब्ध झाली आहे. ज्या सुविधा शासन आपल्याला विविध योजना तर्फे दिले जात आहे. सर्व सामान्य माणसांना त्याचा खूप मोठा उपयोग झालेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांचे जीवन थोडाफार प्रमाणात का होईना पण सुधारले आहेत.
अशीच एक योजना शासनाने अपंग व दिव्यांग व्यक्तींसाठी सुरू केलेली होती. ती म्हणजे मोफत ई रिक्षा वाटप. या योजनेअंतर्गत ज्या दिव्यांग व अपंग व्यक्तींनी फॉर्म अर्ज भरला होता अशा व्यक्तींसाठी एक चांगली बातमी आहे की, ई रिक्षा ज्यांना ज्यांना मंजूर झालेले आहे त्यांचे नाव हे ऑनलाईन पोर्टलवर जाहीर झाले आहेत. हे नावांची लिस्ट आपण कशी पहावी? याची माहिती जर लेखातून आपण जाणार आहोत.
त्यासाठी आपल्याला- https://evehicleform.mshfdc.co.in/ या वेबसाईटवर जायचे आहे. वेबसाईट ओपन झाल्यानंतर उजव्या कोपरांमध्ये सी बेनिफिशियल लिस्ट असा एक ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून झाल्यानंतर सिलेक्ट डिव्हिजन म्हणून ऑप्शन येईल. त्यावर तुमचे डिव्हिजन सिलेक्ट करावे. त्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करावा. जिल्हा सिलेक्ट झाल्या नंतर पुढे येईल त्या बटनावर क्लिक करावी.
व्ह्यू बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती लिस्ट दिसेल या लिस्टमध्ये तुम्ही तुमचं नाव चेक करा. या लिस्टमध्ये ज्या ज्या लोकांना इ रिक्षा मिळणार आहे अशा लोकांची नावे आलेले आहेत. यामध्ये 100% जे जे अपंग आहेत अशा व्यक्तींची नावे आलेले आहेत.
तसेच या वेबसाईटवर तुम्हाला याबद्दलची संपूर्ण माहिती एक लेखी स्वरुपात दिलेली आहे. ती माहिती तुम्ही नक्की वाचा. जर तुम्हाला तुमचे नाव आलेले दिसत नसेल तर, तुम्ही परत फॉर्म भरण्याची गरज नाही. एकदा फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म नक्कीच थोड्या दिवसांनी पुन्हा लिस्ट लागेल. त्यामध्ये तुमचे नाव आलेले दिसून येईल.
अशाप्रकारे ई रिक्षा ज्या ज्या लोकांना मिळणार आहे. अशा लोकांचे नाव ऑनलाईन पोर्टलवर आलेले आहेत. तुम्ही देखील या मध्ये फॉर्म भरला असेल तर नाव लगेच चेक करा.