Saturday, July 27, 2024
Homeआरोग्यखोबरेल तेलामध्ये 'या' दोन वस्तू टाका आणि मच्छर मारण्यासाठी लिक्विड घरीच बनवा..

खोबरेल तेलामध्ये ‘या’ दोन वस्तू टाका आणि मच्छर मारण्यासाठी लिक्विड घरीच बनवा..

मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच असेल की आजकालच्या वातावरणामुळे मच्छर खूप प्रमाणात वाढलेले आहेत. आणि याच मुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार देखील होत आहे. याचा भयंकर परिणाम त्यांच्या आरोग्यावर देखील होत असतो. हे मच्छर मारण्यासाठी बाजारामध्ये विविध प्रकारचे लिक्विड मिळतात. परंतु आजच्या या लेखांमध्ये आपण एक नॅचरल पद्धतीने घरगुती लिक्विड कसे बनवावे? याची माहिती पाहणार आहोत.

 

मच्छर मारण्यासाठी बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लिक्विड मिळतात. परंतु ते अत्यंत विषारी असतात आणि यांना जर आपल्या घरातील लहान मुलांनी हात लावले तर त्याचा वाईट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होऊ शकतो. म्हणूनच आज आपण एक असा उपाय पाहणार आहोत की, जो विषारी नसून अत्यंत नैसर्गिक आहे व त्याचा कोणताही वाईट परिणाम आपल्यावर होणार नाही. तसेच यामधून येणारा वास देखील चांगला असेल.

 

हे बनवण्यासाठी आपल्याला आपल्या घरातील जुना असलेला मच्छर मारण्याची मशीन व त्याखाली असलेली बॉटल लागणार आहे. बाजारामध्ये जे मच्छर मारण्याचे लिक्विड मिळतात ते लिक्विड आपल्या शरीरावर खूप घातक परिणाम करत असतात. आपला घरांमध्ये जर लहान मुल असेल तर त्यावर देखील याचा खूप दुष्परिणाम होऊ शकतो. म्हणून आपण घरच्या घरी या लिक्विडची निर्मिती करू शकतो.

 

तेही अत्यंत कमी किमतीत व ते सुरक्षित देखील असेल. यासाठी आपल्याला एक पली एवढे खोबरेल तेल लागणार आहे. ते खोबरेल तेल एखाद्या छोट्या भांड्यात काढून घ्यावे. त्यानंतर आपल्याला कडुलिंबाची थोडी पाने लागणार आहे. ती पाणी स्वच्छ धुऊन परत थोडी सुकवावी मग यांचा वापर करावा. ही कडूलिंबाची पाने त्या तेलामध्ये घालून गॅसवर गरम करण्यास ठेवावी.

 

गॅस एकदम बारीक असावा. त्यानंतर त्यामध्ये कापूर बारीक करून घालावे. ही कडुलिंबाची पाने चांगली भाजूपर्यंत त्यामध्ये शिजवावे. जेणेकरून आपले कडुलिंबाचे तेल तयार होईल. तुम्हाला तर माहीतच असेल की कडूलिंबाचा वापर हा मच्छर घालवण्यासाठी केला जातो आणि कापरामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये छान सुगंध येण्यास मदत होते.

 

हे झाल्यानंतर गॅस बंद करून त्यातील कडुलिंबाची पाने गाळण्याने शोधून ते तेल त्यातच राहू द्यावे. परत ते तेल गरम करण्यासाठी गॅसवर ठेवावे. त्यामध्ये तीन ते चार लवंगा घालाव्यात. लवंगा घातल्यानंतर लसणाच्या कुड्या किंवा लसणाचा पाचोळा यामध्ये घालावा. हे चांगले काळे होईपर्यंत ते शिजू द्यावे. काळे झाल्यानंतर त्याला गॅसवरून काढावे व हे तेल गाळण्याने गाळून घ्यावे.

 

थंड झाल्यानंतर लिक्विड बॉटलमध्ये घालू हे लिक्विड मशीनला लावावे. नक्कीच तुमच्या घरातील सर्व मच्छर निघून जाते व कोणत्याही प्रकारचा दुर्गंधी येणार नाही. व याचा कोणताही दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर होणार नाही. कारण हे अत्यंत नैसर्गिक आहे.

 

अशाप्रकारे आपण घरच्या घरी नैसर्गिक व सुगंधी मच्छर घालवण्यासाठी लिक्विड तयार करू शकतो. तुम्ही देखील हे करून बघा. नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला अनुभव येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -