Saturday, January 24, 2026
Homeराशी-भविष्य२८६ दिवस ‘या’ राशींवर असेल लक्ष्मीची कृपा? केतूची चाल बदलल्याने घरात येऊ...

२८६ दिवस ‘या’ राशींवर असेल लक्ष्मीची कृपा? केतूची चाल बदलल्याने घरात येऊ शकतो पैसाच पैसा

ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) ग्रह, नक्षत्रांचा आपल्या आयुष्यावर मोठा परिणाम होत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार कोणताही ग्रह किंवा नक्षत्र आपल्या हालचालीत बदल करत असेल तर त्याचा जातकांच्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. ज्योतिष शास्त्रामध्ये केतूला छाया ग्रह मानले जाते. हा ग्रह अनुकूल स्थितीमध्ये असेल तर अनेक गोष्टी सोप्या होतात आणि जीवन सुखमय होते, असे म्हटले जाते.

ऑक्टोबर २०२३ मध्ये केतूने कन्या राशीत गोचर केलं आहे. येणारे २८६ दिवस केतू कन्या राशीतच विराजमान राहणार आहे. त्यामुळे या दिवसात काही राशींचे भाग्य चमकण्याची शक्यता आहे. या राशींना अधिक फायदे देखील मिळू शकतात. चला तर पाहूया कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…

 

‘या’ राशी होतील मालामाल?

मेष राशी

२८६ दिवस केतूची स्थिती मेष राशीच्या लोकांसाठी सुखाचे दिवस घेऊन येणारे ठरु शकते. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी लाभ मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. आर्थिक स्थितीतही सुधारणा होण्याची शक्यता आहे. या कालावधीत तुम्हाला शेअर बाजार आणि लॉटरीमधून नफा मिळू शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्हाला मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. समाजात मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे.कर्क राशी

कर्क राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होऊ शकतो. केतुच्या कृपेने या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतात. या राशीचे लोक नोकरी-व्यवसायात खूप यश मिळवू शकतात. जुने अडकलेले पैसे मिळाल्याने तुमची आर्थिक बाजू मजबूत होऊ शकते. परदेशात जाण्याचे किंवा परदेशी कंपनीत नोकरी मिळवण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. तुम्हाला बढती आणि पगारवाढीचा लाभ मिळू शकतो. संतती सुखाची शक्यता आहे. या काळात तुम्ही नवीन घर किंवा नवीन कार खरेदी करू शकता.

 

वृश्चिक राशी

केतूच्या गोचरमुळे वृश्चिक राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. या काळात तुमचे उत्पन्न दुप्पट होण्याची शक्यता आहे. तुम्हाला उत्पन्नाचे आणखी स्त्रोत देखील मिळू शकतात. नोकरीच्या संधी मिळू शकतात. या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. या काळात रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच, सरकारी क्षेत्राशी संबंधित लोकांना पद, प्रतिष्ठा इत्यादी फायदे मिळू शकतात.

 

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -