Tuesday, December 24, 2024
Homeमहाराष्ट्रआरबीआयची मोठी घोषणा! बँकेत जाण्याची गरज नाही; आता UPI द्वारे ATM मध्ये...

आरबीआयची मोठी घोषणा! बँकेत जाण्याची गरज नाही; आता UPI द्वारे ATM मध्ये पैसे होतील जमा

 

आता एटीएममध्ये पैसे जमा करण्यासाठी डेबिट कार्डची गरज भासणार नाही. आतापर्यंत अनेक बँका कार्डलेस डिपॉझिटची सुविधा देतात, परंतु RBI ने एक पाऊल पुढे टाकले आहे आणि UPI द्वारे पैसे जमा करण्याची सुविधा यात जोडली आहे.

 

पैसे कसे जमा होणार?

आरबीआयने याबाबतची घोषणा केली आहे. मात्र हे कसे चालेल, याबाबत बँकांकडून अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. परंतु आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, तुम्हाला ATM स्क्रीनवर UPI/QR कोडचा पर्याय दिला जाईल. एकदा तुम्ही ते स्कॅन केल्यानंतर, तुम्हाला तुमचे बँक तपशीलांची माहिती द्यावी लागेल. (RBI Announces Cash Deposit Facility Via UPI, No Need Of ATM Card Now, know Details)

 

म्हणजेच, QR कोड स्कॅन केल्यानंतर, जेव्हा तुम्ही UPI पिन टाकाल, तेव्हा तुमचे बँकिंग तपशील स्क्रीनवर दिसतील. येथे तुम्हाला तपशीलांची तपासणी करण्यास सांगितले जाईल. त्यानंतर तुम्हाला एटीएम मशीनमध्ये रोख रक्कम जमा करावी लागेल. यानंतरची संपूर्ण प्रक्रिया कार्डलेस डिपॉझिट दरम्यान केली जाते तशीच असेल.ही सुविधा कधी उपलब्ध होईल याची तारीख अद्याप देण्यात आलेली नाही. पण या सुविधेचे अनेक फायदे आहेत कारण जर तुम्ही ही सुविधा वापरली तर तुम्हाला बँकेच्या वेळेची वाट पाहावी लागणार नाही. तुम्ही कधीही जाऊन पैसे जमा करू शकता.

 

आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले, “UPI वापरून कार्ड-लेस पैसे काढण्याचा अनुभव लक्षात घेता, आता कॅश डिपॉझिट मशीन (सीएमएम) ला परवानगी देण्याचा निर्णय घेतला जात आहे.आरबीआयच्या म्हणण्यानुसार, एकीकडे बँकांमध्ये कॅश डिपॉझिट मशीनचा वापर केल्याने ग्राहकांना सोयीचे झाले आहे. त्याचबरोबर बँक शाखांमध्ये रोख रक्कम जमा करण्याची संख्या कमी झाली आहे. आता UPI ची लोकप्रियता पाहता, कार्डशिवाय रोख रक्कम जमा करण्याची सुविधा देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -