Friday, February 7, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजीत आज लग्नाची घाई, प्रचाराला कोणीच न्हाई..!

इचलकरंजीत आज लग्नाची घाई, प्रचाराला कोणीच न्हाई..!

ताजी बातमी /ऑनलाईन टीम

 

आज रविवारी लग्नाचा मुहूर्त असल्याने आजच्या मुहूर्ताला आणि त्यातच रविवार साधून आलेला मुहूर्त सर्व कार्यकर्ते नेतेमंडळाची जवळची मंडळी आपापल्या पै पाहुण्यांच्या, नातलगांच्या लग्नात उपस्थिती लावण्यास जात असल्याने गेले असल्याने आज प्रचाराचे काम थोडे मंदावल्याची चित्र दिसून येत होते.

 

तर काही लग्नांना उमेदवार उपस्थिती लावून शुभेच्छा देण्यासाठी जाणार असल्याचे येणार असल्याचे देखील सांगण्यात येत होते. दरम्यान यामुळे आज प्रचाराला यंत्रणा कमी पडत असल्याने प्रचाराचे काम थोडे मंदावले.

 

असे जरी असले तरी आजच्या दिवसातले दिवसभरातील रेंगाळलेले काम सायंकाळनंतर कार्यकर्ते लोक आल्यानंतर गतीने होऊन रात्री उशिरापर्यंत चालेल असे देखील कार्यकर्त्यातून बोलण्यात येत होते. यामुळे आज लग्नाची घाई प्रचाराला कोणी न्हाई..! अशा अर्थाच्या चर्चा सर्वत्र सुरू होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -