Thursday, February 12, 2026
Homeइचलकरंजीइचलकरंजीत वाढदिवस ; २० जणांवर गुन्हा

इचलकरंजीत वाढदिवस ; २० जणांवर गुन्हा

जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाची अवहेलना करून बेकायदेशीर जमाव जमा करून वेगवेगळ्या दोन ठिकाणी वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी सुमारे २० जणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटना भाग्यरेखा टॉकीजसमोर व महात्मा गांधी सोसायटी समोर घडल्या. गुन्हा नोंद करण्यात आलेल्यांमध्ये जर्मनी टोळीतील रोहन सुरेश गेजगे, अक्षय अशोक कोंडुगळे, तुषार अनिल शिंदे, अनिकेत गौतम व्हराळे यांसह अज्ञातांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधवारी रात्री नऊ + वाजण्याच्या सुमारास महात्मा गांधी सोसायटी समोर जर्मनी टोळीतील रोहन गेजगे, अक्षय कोंडुगळे यांसह दहा जण एकत्र जमले होते. मोठमोठ्या आवाजात भागातील नागरिकांना त्रास देत मित्राचा वाढदिवस करत होते.

त्याचप्रमाणे थोड्या वेळाने सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास भाग्यरेखा टॉकीजसमोर तुषार शिंदे, अनिकेत व्हराळे यांसह १० जण वाढदिवस साजरा करत होते. याबाबत भागातील नागरिकांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी घटनेची नोंद दुसऱ्या दिवशी घेतली. आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाची अवहेलना करून बेकायदेशीर जमाव जमा करून वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -