Wednesday, August 6, 2025
Homeक्रीडारॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या 8 खेळाडूंची टी20 वर्ल्डकपसाठी निवड, कोण आहेत ते जाणून...

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या 8 खेळाडूंची टी20 वर्ल्डकपसाठी निवड, कोण आहेत ते जाणून घ्या

 

आयपीएल स्पर्धेचं 17 वं पर्व संपल्यानंतर लगेचच टी20 वर्ल्डकपचे वेध लागणार आहे. 1 जूनपासून टी20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यात एकूण 20 संघ सहभागी असून भारताचा पहिला सामना 5 जूनला होणार आहे. ही स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये संयुक्तरित्या होणार आहे. त्यामुळे आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंनाही आता टी20 वर्ल्डकपचे वेध सुरु झाले आहेत. टी20 वर्ल्डकपसाठी संघांची घोषणा झाली आहे. बीसीसीआयने 30 एप्रिलला टीम इंडियाची निवड केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात 15 खेळाडूंचा चमू आता सज्ज झाला आहे. दुसरीकडे, आयपीएलमध्ये सुमार कामगिरी करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. कारण या संघातील एकूण 8 खेळाडू टी20 वर्ल्डकप संघात खेळणार आहे. विराट कोहली, मोहम्मद सिराज यांची निवड झाली आहे. तर इतर विदेशी खेळाडू आणि त्यांच्या संघाबाबत जाणून घेऊयात.

आरसीबीकडून खेळणारा ग्लेन मॅक्सवेल सध्या फेल ठरला आहे. त्याच्या बॅटीतून धावा होत नाहीत. मात्र असं असलं तरी त्याला ऑस्ट्रेलियाने 15 सदस्यांच्या संघात स्थान दिलं आहे. ग्लेन मॅक्सवेल बॅटिंग आणि गोलंदाजी करण्यात सक्षम आहे. तर अष्टपैलू कॅमरून ग्रीनही त्याच्यासोबत संघात असणार आहे. इंग्लंडच्या टी20 वर्ल्डकप संघात विल जॅक्स आणि रीस टोपले यांचा समावेश आहे. विल जॅक्सने आपलं रौद्र रुप मागच्या काही सामन्यात दाखवून दिलं आहे. तर रीस टोपलेने आपल्या भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवलं आहे.

 

न्यूझीलंड संघाने आपल्या टी20 संघात वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनचा समावेश केला आहे. वेस्ट इंडिजनेही टी-20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या संघात वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाची कामगिरी कशीही असली तर संघात तगडे खेळाडू आहेत हे मान्य करायला हवं. अन्यथा त्या त्या देशांच्या क्रिकेट मंडळांनी या खेळाडूंची निवड केलीच नसती. आता हे खेळाडू टी20 वर्ल्डकपमध्ये कशी कामगिरी करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -