कार उत्पादन करणारी कंपनी टेस्ला आणि तिचा मालक Elon Musk हा कायम चर्चेत असतो. सोशल मीडियावर त्यांची चर्चा सुरु असते. मस्क एक्सवर कायम सक्रिय असतो. गेल्या वर्षी त्याने हा प्लॅटफॉर्म ताब्यात घेतला. आता एलन मस्क त्याच्या रोबोटॅक्सीवर लक्ष देत आहे. मस्क त्याची रोबोटॅक्सी या वर्षी 8 ऑगस्ट रोजी लाँच करणार आहे. टेस्लाच्या चाहत्यांना या रोबोटॅक्सीची प्रतिक्षा आहे. या रोबोटॅक्सीमध्ये खास फीचर्स मिळू शकतात. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की मस्क याने रोबोटॅक्सी लाँचिंगसाठी 8 ऑगस्ट हीच तारीख का निवडली?
एका वृत्तानुसार, टेस्ला दोन वाहनं बाजारात आणणार आहे. यामध्ये एका इलेक्ट्रिक वाहनाचा समावेश आहे. त्याची किंमत टेस्लाच्या इतर वाहनांपेक्षा थोडी कमी असेल. तर दुसरे वाहन हे पूर्णपणे ऑटोमेटिक कार असेल. या कारमध्ये स्टेअरिंग व्हील आणि पॅडल नसेल. ही कार विना स्टेअरिंग आणि पॅडलची रस्त्यावर धावेल.
टेस्लाच्या रोबोटॅक्सी लाँच करण्याची माहिती एलॉन मस्क याने त्याच्या एक्स हँडलवर दिली आहे. यामध्ये त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की टेस्लाची रोबोटॅक्सी बाजारात 8 ऑगस्ट रोजी, म्हणजे 8 तारखेला आणि 8 महिन्यात दाखल होणार आहे.
रोबोटॅक्सीची डिझाईन
सध्या या कारविषयीची जास्त काही माहिती हाती आलेली नाही. अनेकांना या कारचे डिझाईन कसे आहे, याविषयीची उत्सुकता ताणल्या गेली आहे. सध्या समोर आलेल्या डिझाईननुसार, रोबोटॅक्सीचे डिझाईन हे Cybertruck सारखे असेल. कंपनी या रोबोटॅक्सीविषयीची माहिती लवकरच समोर आणणार आहे. एलॉन मस्क हे त्यांच्या रोबोटॅक्सीविषयी लवकरच माहिती देतील. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की मस्क याने 8 ही तारीख आणि आठवाच महिना रोबोटॅक्सी लाँच करण्यासाठी का निवडला असेल?
8/8 चे कारण तरी काय?
मस्क याच्या एका फॉलोअरने त्याचे उत्तर दिले आहे. रोबोटॅक्सी ही 8/8/2024 रोजी बाजारात दाखल होत आहे. त्यामागे एक कारण आहे, ते म्हणजे चीनमध्ये 8 हा अंक शुभ मानण्यात येतो. त्यामुळेच ही तारीख निवडण्यात आल्याचे या फॉलोअरने स्पष्ट केले. त्याला एलॉन मस्क याने पण ट्विटरवर मान डोलावली आहे. त्याने या तर्काला सहमती दिली आहे.