आयसीसीने वूमन्स क्रिकेट टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा 2024 चं वेळापत्रक जाहीर केलं आहे. आयसीसीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. तसेच एकूण 19 दिवस वूमन्स टी 20 वर्ल्ड कपचा थरार रंगणार आहे. या एकूण 19 दिवसांमध्ये 23 सामने पार पडणार आहेत. हे सर्व सामने ढाका आणि सिल्हेटमध्ये पार पडणार आहेत. तसेच उपांत्य अंतिम फेरीतील सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. बांगलादेशकडे वर्ल्ड कपच्या यजमानपदाचा मान आहे.
आयसीसीने एकूण सहभागी 10 संघांना 5-5 नुसार 2 गटात विभागलं आहे. त्यानुसार ए ग्रुपमध्ये टीम इंडियासह पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि क्वालिफायर 1 टीमचा समावेश करण्यात आला आहे. तर बी ग्रुपमध्ये दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि क्वालिफायर 2 टीमचा समावेश असेल. प्रत्येक टीम साखळी फेरीत 4 सामने खेळणार आहेत. त्यानंतर प्रत्येक गटातून टॉप 2 टीम सेमी फायनलसाठी क्लालिफाय करतील आणि त्यानंतर अंतिम सामन्यासाठी 2 संघ निश्चित होऊन वर्ल्ड कप विनर ठरेल.
2 जागांसाठी 10 संघात चढाओढ
टीम इंडिया, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या 6 संघांनी टी 20 वर्ल्ड कपसाठी थेट क्वालिफाय केलं. तर यजमान बांगलादेश आणि पाकिस्तान दोन्ही संघांना आयसीसी रँकिंगमुळे वर्ल्ड कपचं तिकीट मिळालंय. तर उर्वरित 2 संघ हे आयसीसी टी 20 वर्ल्ड कप ग्लोबल क्वालिफायरमधून ठरणार आहेत. 2 जागांसाठी एकूण 10 संघांमध्ये चुरस आहे. या 10 संघांमध्ये आयर्लंड, नेदरलंड, स्कॉटलंड, श्रीलंका, थायलंड, युगांडा, यूएसए, वानुअतू आणि झिंबाब्वेचा समावेश आहे. यापैकी 2 विजेते संघ मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरतील.
पाहा संपूर्ण स्पर्धेचं वेळापत्रक
कोणती टीम कोणत्या ग्रुपमध्ये?
ग्रुप ए : टीम इंडिया, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिा, न्यूझीलंड आणि क्वालिफायर 1
ग्रुप बी : दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि क्वालिफायर 2
टीम इंडियाच्या सामन्याचं वेळापत्रक
विरुद्ध न्यूझीलंड, 4 ऑक्टोबर, सिल्हेट.
विरुद्ध पाकिस्तान, 6 ऑक्टोबर, सिल्हेट.
विरुद्ध क्वालिफायर 1, 8 ऑक्टोबर, सिल्हेट.
- विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 13 ऑक्टोबर, सिल्हेट.